Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narendra Modi : मोदींनी दाखवली पुन्हा अस्खलित मराठीची चुणूक; सोलापुरात दमदार भाषण

Rashmi Mane

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा आपल्या अस्खलित मराठीची चुणूक उभ्या देशाला दाखवून दिली. निमित्त होते सोलापूर येथे उभारल्या गेलेल्या 'रे-नगर' गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याचे. पंतप्रधान मोदी मराठीत काय बोलणार, याची उत्सुकता उपस्थित नागरिकांना होती.

पंतप्रधानांनीही त्यांची निराशा न करता आपल्या भाषणाच्या मध्ये-मध्ये मराठीचा वापर केला. 'पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरमहाराज यांना मी नमन करीत आहे,' असे मोदींनी म्हणताच उपस्थित हजारो लोकांमध्ये उत्साह संचारला. सर्वांनी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

सोलापूरमधील कुंभारी येथे 'रे-नगर'या अशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनीही आपले भाषण मराठी आणि हिंदीत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक भाषा अन् वातावरणनिर्मिती

पंढरपूरचा विठ्ठल आणि श्री सिद्धेश्वरमहाराज यांनी मी नमस्कार करीत आहे, अशा शब्दांत मोदींनी मराठीत भाषण करून लोकांची मने जिंकली. पंतप्रधान काय बोलणार, याविषयी नेहमीच लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण असते. भाषण सुरू होताच मोदी थेट जनतेशी संवाद साधत लोकांना आपलेसे करतात. मोदी-मोदींच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून जातो. पंतप्रधान ज्या ज्या राज्यात जातात तेथील स्थानिक भाषेतून जनतेशी संवाद साधत लोकांची मने जिंकतात. पंतप्रधान नेहमीच स्थानिक भाषेत भाषणाला सुरुवात करून वातावरणनिर्मिती करतात.

पंतप्रधान मोदींचा मराठीतील संवाद त्यांच्याच शब्दांत

  • "पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि श्री सिद्धेश्वरमहाराजांना मी नमन करत आहे."

  • "मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी"

  • "आपले जीवन सुखाने भरून राहो, हीच राम प्रभूची इच्छा आहे."

  • "आमची निष्ठा देशाप्रती आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आहे."

  • "विकसित भारत बनवण्यासाठी भारताला आत्मनिर्भर भारत बनवणे गरजेचे आहे."

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT