Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. कुंभारीच्या रे-नगर येथील गृहनिर्माण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या सोहळ्याला उपस्थित आहेत. मागील आठ दिवसांत पंतप्रधान दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नुकतेच नाशिक, मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यामुळे पंतप्रधानांच्या या सोलापूर दौऱ्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.
जिथे राजकीय फायदा तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) जातात. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे पंतप्रधान या दोन राज्यांत वारंवार दौरा करतात. मणिपूरमध्ये 25 जागा असत्या तर मोदी तेथेदेखील गेले असते. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष केवळ लोकसभेच्या आकड्यांचा विचार करतो, म्हणूनच त्यांचे महाराष्ट्रावर अधिक लक्ष आहे, असे राऊत म्हणाले.
दावोसमधून महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक येत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या दाव्यावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात गुंतवणूक येण्याआधीच महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारील गुजरातमध्ये जात आहेत. आजही मुंबईला ओरबाडण्याचे काम सुरू आहे. आपल्या राज्यातील गुंतवणूक शेजारील राज्यात गेली ती परत आणली तर मुख्यमंत्र्यांचा मराठीबाणा आम्हाला दिसेल, असे राऊत म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आठ हजार कोटींपेक्षा जास्त मोठा अॅम्ब्युलन्स घोटाळा आहे. या घोटाळ्याने मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होत नसतील तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा टोला राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच याआधीदेखील अॅम्ब्युलन्स घोटाळा करण्यासाठी एका अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला. आरोग्य विभागाचाच नव्हे, तर राज्यात झालेला, असा आरोप राऊत यांनी केला होता.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.