Narsayya Adam-Narendra Modi
Narsayya Adam-Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narsayya Adam Dream Project : मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी माकपचे आडम मास्तर लागले कामाला; माजी आमदारांची स्वप्नपूर्ती

Vijaykumar Dudhale

Solapur News : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर शहरातील रे नगर येथे १५ हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीत होणार आहे. मोदी यांची पन्नास एकरांवर सभा होणार आहे. त्यासाठी एक लाख लोकांची गर्दी जमविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि या प्रकल्पाचे प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आडम यांना मोदींसोबत व्यासपीठावर जाण्यास परवानगी दिली आहे. (Narsayya Adam allowed by CPI(M) to go on platform with PM Narendra Modi)

सोलापूर शहरालगतच्या कुंभारी येथे सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करून असंघटित कामगारांसाठी १५ हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या जानेवारी महिन्यात या घरकुलांचे वाटप होणार आहे. हा कार्यक्रम सोलापूर येथील रे नगर येथे १४ जानेवारीच्या अगोदर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घरकुल वाटपाच्या मोदी यांच्या कार्यक्रमाची तयारी पंतप्रधान कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. असंघटित कामगारांना हक्काचे घरकुल मिळावे, असे माजी आमदार नरसय्या आडम यांचे स्वप्न होते. हा प्रकल्प आडम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रे नगर येथे सुमारे १५ हजार घरे बांधण्यात आल्याने आडम यांचे स्वप्न पूर्ण होत असून कामगारांना आता घरांच्या चाव्या मोदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

सुमारे शंभर एकर जागेवर मोदी यांची सभा होणार आहे, अशी माहिती खुद्द माजी आमदार आडम यांनी दिली आहे. त्यामुळे स्वप्नपूर्ती होत असलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आडम मास्तरही कामाला लागले आहेत. मोदी यांच्या सभेला एक लाख लोक यावेत, अशी अपेक्षा असून त्यानुसार भाजप आणि माकपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

सिद्धेश्वर यात्रेचे शहर भाजपकडून निमंत्रण

दरम्यान, सोलापूरला मकरसंक्रांतीला सिद्धेश्वर यात्रा असते. मोदी १४ जानेवारीच्या आसपास सोलापुरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर शहर भाजपकडून मोदी यांनी सिद्धेश्वर यात्रेसाठी यावे, असे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी ‘मोदी यांनी यात्रेला यावे’ यासाठी पंतप्रधान कार्यालयाला अधिकृतरित्या निमंत्रण देणार असल्याचे म्हटले आहे. मोदी यांच्या होणाऱ्या या सभेमुळे सोलापूर भाजपमध्ये उत्साह संचारला आहे.

माकपकडून आडम मास्तरांना परवानगी

या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी माजी आमदार आडम हे मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर गेले होते. तसेच, भाषणातून त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना केंद्रीय समितीमधून निलंबित केले होते. त्यामुळे आडम यांनी या वेळी मोदींच्या सोबत व्यासपीठावर जाण्यासाठी पक्षाकडे रितसर परवानगी मागितली होती. असंघटित कामगारांचा विषय असल्याने माकपच्या पक्षश्रेष्ठींनी आडम यांना मोदींसोबत व्यासपीठावर जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT