-पांडुरंग बर्गे
Koregaon Political News : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरात सुमारे चारशे कोटी रुपयांहून अधिकची विकासकामे सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित अशी विकासकामे केली जात असल्याचे पाहून प्रभावित झालेल्या माजी नगरसेवक सचिन बाळासाहेब बर्गे, संजय तानाजीराव बर्गे पाटील, माजी उपसरपंच विलासराव शंकरराव बर्गे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित विलासराव बर्गे व गणेश येवले यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
कोरेगाव Koregaon City शहरासाठी महायुती सरकारने तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सातारा जकात नाका परिसरात करण्यात आला. या वेळी आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.
या वेळी आमदार महेश शिंदे यांनी नजीकच्या काळात कोरेगाव शहराबरोबरच मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही दिली. माहेश्वरी भवन येथे शहरवासीयांच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा विकास निधी कोरेगाव शहरासाठी दिल्याबद्दल आमदार महेश शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोरेगाव शहराला सातारा शहराची शॅडो सिटी बनवायची असून, पाश्चिमात्य देशांतील शहरांचा दर्जा या शहराला द्यायचा असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहराचे नेतृत्व करणार्यांनी यापूर्वी केवळ नारळ फोडण्याचे काम केले, विकास निधीचा थांगपत्ता नसताना, केवळ जनतेची भालवण करण्यासाठी नारळ फोडले गेले, मात्र विकासकामे झालीच नाहीत.
विकासकामांचा मोठा बॅकलॉग होता, तो भरून काढण्याची संधी सर्वसामान्य जनतेने २०१९ मध्ये दिली. आम्ही केवळ नारळ फोडत नाही, तर प्रत्यक्षात विकासकामे सुरू करून सर्वसामान्यांचे हित पाहतो. आज नारळ फोडला म्हणजे काम सुरू झाले पाहिजे, हाच शिरस्ता पहिल्या दिवसापासून ठेवला असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
सातार्यापेक्षा कोरेगाव शहर चांगले बनणार असून, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे हे शहर बनेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तीळगंगा नदी सुशोभीकरण, आझाद चौकातील भाजी मंडई संकुल, जुना मोटार स्टँड आणि शासकीय विश्रामगृहाची उभारणी केली जात असून, निधी नगरपंचायतीकडे वर्गदेखील झालेला आहे.
पाश्चिमात्य देशातील इमारतींचा साज या इमारतींना असून, अशा इमारती राज्यात तुम्हाला कोठे पहायला मिळणार नाहीत, इतक्या सुंदर त्या असणार आहेत. एकंदरीत कोरेगाव आता बदलत चालले असून, जनतेचा विश्वास संपादन करुन विकासकामे केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आझाद चौकातील भाजी मंडई संकुलामुळे बाधित होणार्या कुटुंबियांना ४० लाख रुपये किंमतीची घरे मिळणार आहेत. विकासकामे करत असताना श्रीमंत माणसे श्रीमंत बनली नाही पाहिजेत, तर गरीब माणसे मोठी झाली पाहिजेत, याकडे आपला कल आहे, त्यादृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.