Jawali Political News : शशिकांत शिंदे राजकारणात मोठा होईल, या भीतीने मला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अडवण्यात आले. राजकारणात हार-जीत होत असते. शरद पवारांनी माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला आमदार, मंत्री केले. याची जाणीव ठेवून शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहे. सध्याचा काळ हा पक्षासाठी अडचणींचा असला तरी कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला नंबर वन करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी नांदगणे येथील स्वाभिमान सभेत केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जावळी तालुक्यातील Jawali Taluka नांदगणे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते. या सभेत आमदार शिंदे Shashikant Shinde बाेलत होते. या वेळी राष्ट्रवादी आयटी सेलचे राज्याध्यक्ष सारंग पाटील, बापूराव पार्टे, उद्योजक राजेंद्र धनावडे, बाजीराव धनावडे, युवकचे तालुकाध्यक्ष अतिष कदम, आनंदराव जुनघरे आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘‘आतापर्यंत एवढे मोठे स्वागत कधीच झाले नव्हते. मात्र, जावळीच्या जनतेच्या मनात अजूनही माझे नाव कोरलेले आहे, याचा मला अभिमान आहे. शरद पवार यांच्या विचारांना साथ देण्यासाठी जावळी तालुक्यात सर्वप्रथम स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले, याचे समाधान आहे.
बोंडारवाडी धरणासाठी सर्वप्रथम प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाले होते. शरद पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न कायमचा सोडवून ५४ गावांतील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शशिकांत शिंदे राजकारणात मोठा होईल, या भीतीने मला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अडवण्यात आले.
राजकारणात हार-जीत होत असते. शरद पवारांनी माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला आमदार, मंत्री केले. याची जाणीव ठेवून शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहे. सध्याचा काळ हा पक्षासाठी अडचणींचा असला तरी कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला नंबर वन करण्यासाठी काम केले पाहिजे.’’
पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा असून, जावळी तालुक्यात राष्ट्रवादी संपली हे म्हणणाऱ्या विरोधकांना या मेळाव्यातून उत्तर मिळाले आहे. यापुढे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. जावळी पुन्हा राष्ट्रवादीमय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जावळी तालुक्यात दहा वर्षे आमदार म्हणून काम केले. विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली नसती, तर जावळी तालुका राज्यात आदर्श केला असता. १४ वर्षे झाली, तरी जावळीतील जनता माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जावळीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.