Jayant Patil, Pratik Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Crisis : राष्ट्रवादीच्या संघर्ष काळात बाप-बेटे मैदानात ; प्रतीक पाटील कराडमध्ये तर..

Maharashtra Politics : जयंत पाटील मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.

रश्मी पुराणिक

Karad News :अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संघर्षाच्या काळात पक्षातील अनेक नेत्यासमोर कुठल्या गटात जावे, हा मोठा प्रश्न असून नेते संभ्रमात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कालपासून (रविवारी) मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. जयंत पाटील मुंबई येथे थांबून सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत व येणाऱ्या काळाची व्यूहरचना आखत आहेत. त्याचे पुत्र प्रतीक पाटील हे शरद पवार यांच्या स्वागतासाठी कराड येथे उपस्थित होते.

शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित यांनी शुक्रवारी (30 जून) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर रविवारी (1 जुलै) राष्ट्रवादीमध्ये बंड करत शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सामील झाले.

यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. अजित पवारांशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे -पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूकंपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. बैठकांचा सिलसिला सुरु आहे. अजित पवार यांच्या 'देवगिरी'बंगल्यावर नऊ मंत्र्यांची बैठक सुरु आहे. आज मनसे, शिवसेनेचीही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे गटांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक होत असून खासदार, आमदार तसेच प्रमुख नेत्यांना बैठकीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT