Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूकंपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. बैठकांचा सिलसिला सुरु आहे. नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'देवगिरी'बंगल्यावर नऊ मंत्र्यांची बैठक सुरु आहे.
आज मनसे, शिवसेनेचीही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे गटांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक होत असून खासदार, आमदार तसेच प्रमुख नेत्यांना बैठकीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये रविवारी झालेल्या राजकीय भूकंपावर चर्चा होणार आहे. पुढील शिवसेनेची राजकीय रणनीती, वाटचाल काय असणार आहे. यावर देखील चर्चा होणार आहे.
शिंदे गटातील अनेक आमदार मंत्री बनण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारा कोणत्या मंत्र्यांना आणि किती मंत्र्यांना स्थान देण्यात येईल यावर देखील चर्चा होणार आहे.
शिवसेना पक्षातून बाहेर पडताना चाळीस आमदारांनी अजित पवार यांच्यावर निधी मिळत नसल्याची टीका केली होती. मात्र त्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
त्यामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झालं असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील आमदार आणि खासदारांना काय सूचना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. चव्हाण माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांच्या फुटीवर चव्हाण यांनी भुमिका स्पष्ट केली. "स्वाक्षरी करण्यासाठी आमदारांना फसवले गेले," असे चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "जनतेला गद्दारी अजिबात आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत. त्यांनी राजीनामे देवून निवडणुकीला सामोरे जावे. त्यांना योग्य जागा कळेल," "मोदी व भाजप विरोधात महाविकास आघाडी कायम राहणार आहे. जे सोबत आहेत. त्यांना सोबत ताकदीने आम्ही भाजप विरोधात लढा देणार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.