NCP Crisis : राष्ट्रवादीचे दोन प्रतोद ? ; व्हिप कुणाचा लागू होणार..

Jitendra Awhad, Anil Patil NCP Pratod : दोन्ही गटांनी 5 जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक बोलावली आहे.
Anil Patil,  Jitendra Awhad
Anil Patil, Jitendra Awhad Sarkarnama
Published on
Updated on

MaharashtraPolitics : रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काही नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काल (रविवारी) सहभागी झाले आहेत.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या अवघ्या दोन तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. त्यानंतर अजित पवार यांनी आज (सोमवारी) मंत्री अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड केली आहे.

Anil Patil,  Jitendra Awhad
सातारा दौऱ्यात पवारांचं प्रचंड स्वागत; दीडशे वाहनांचा ताफा, यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन !

त्यामुळे आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि अनिल पाटील असे दोन प्रतोद झाल्याने व्हिप कुणाचा लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी 5 जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक बोलावली आहे.

Anil Patil,  Jitendra Awhad
Eknath Shinde : अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता ; मुख्यमंत्री शिंदे आज पुढील रणनीती ठरविणार..

दोन्ही गट आपली ताकद दाखवण्यासाठी आपापल्या समर्थकांची जमवाजमव करीत आहेत. त्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांना सूचनाही दिल्या आहेत.या बैठकीचे निमंत्रणही दोन्ही गटाच्या नेत्यांना पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचा कोणता नेता कोणत्या गटासोबत आहे, हे दोन्ही बैठकांमधून स्पष्ट होणार असल्याचे मानले जात आहे. पण व्हिप कुणाचा लागू होणार,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com