Umesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Zilla Parishad Result : अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याचा ZP निवडणुकीत पराभव; कुरुल गटातून भाजपचे सचिन जाधव विजयी

Umesh Patil Defeat : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला असून, मतदारसंघ बदलूनही त्यांना विजय मिळवता आला नाही.

Vijaykumar Dudhale

Solapur, 09 February : सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेल्या मोहोळ तालुक्यातील कुरुल गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. मतदारसंघ बदलूनही उमेश पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे, त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे.

कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि भाजपचे उमेदवार जकराया शुगरचे प्रमुख सचिन जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली. दोघांमध्ये चुरशीची लढाई झाली, प्रचारात दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरात झाले, त्यामुळे कुरुल गटातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कुरुल जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांना 11 हजार 174 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांना 9871 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सचिन जाधव हे कुरुल गटातून 1303 मतांनी विजयी झाले आहेत

कुरुल गणातून राष्ट्रवादीचे धनाजी माळी हे विजयी झाले आहेत, तर भाजपचे अस्लम चौधरी हे घोडेश्वर गणातून विजयी झाले आहेत, त्यामुळे कुरुल गटात क्रॉस व्होटिंग झाल्याचे उघड झाले आहे.

उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे, त्यामुळे माजी आमदार पाटील यांनी कुरुल गटात ताकद लावली होती. निवडणुकीपूर्वी राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यात आव्हान आणि प्रतिआव्हान दिलं गेलं होतं. त्यामुळे कुरुलची लढत सर्वाधिक लक्षवेधी होती.

उमेश पाटील यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या नरखेड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव झाला आहे. संतोष पाटील यांचा भाजपचे उमदेवार लखन शिंदे यांनी 4000 मतांनी विजयी झाले आहेत.

माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नरखेड जिल्हा परिषद गटासह नरखेड पंचायत समिती आणि शिरापूर पंचायत समिती तिन्ही जागेवर भाजप विजयी झाले आहेत. यापूर्वी उमेश पाटील यांनी नरखेड गटातून प्रतिनिधीत्व केलेले आहे, त्यामुळे या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

मोहोळ तालुक्यातील पक्षीय बलाबल (जिल्हा परिषद गट)

भाजप : ४ - कामती, नरखेड, पोखरापूर, कुरुल

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : १ आष्टी

शिवसेना -( एकनाथ शिंदे) : १ पेनुर

________

मोहोळ पंचायत समिती गण

भाजपा : ७ नरखेड, शिरापूर,कामती, सावळेश्वर, पोखरापूर, टाकळी सिकंदर, घोडेश्वर

राष्ट्रवादी काँग्रेस :३ आष्टी, खंडाळी, कुरूल

शिवसेना (एकनाथ शिंदे) : १ पेनूर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : १ सय्यद वरवडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT