ZP Election Result update : सुनेच्या विजयानंतर सासरे देवराम लांडेंनी लाज आणली; फक्त लंगोटवर केला विजयी जल्लोष... 

Devaram Lande celebration : विजयी जल्लोष करताना देवराम लांडे केवळ लंगोटवर होते. एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून त्यांनी विजय साजरा केला.
Devram Lande
Devram LandeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra local body elections : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये पुण्यात पुन्हा राष्ट्रवादीने एकहाती सत्ता काबीज केल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयानंतरही जिल्ह्यात बहुतेक उमेदवारांनी विजयाचा जल्लोष केला नाही. मात्र झेडपीचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी जल्लोष करताना लाज आणली.

जुन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवराम लांडे यांच्या विजयी जल्लोषाची राज्यभर चर्चा रंगली आहे. लांडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या सून सोनाली अमोल लांडे यांच्या झेडपीच्या निवडणुकीत विजय झाला आहे. निकाल हाती आल्यानंतर लांडे यांनी जोरदार जल्लोष केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

विजयी जल्लोष करताना देवराम लांडे केवळ लंगोटवर होते. एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून त्यांनी विजय साजरा केला. त्यांनी हातात अजितदादांचा फोटोही घेतला होता. मात्र फक्त लंगोटवर कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झाल्याने चर्चेचा विषय बनले आहेत.

एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार अजितदादांच्या आठवणीने भावूक होत असताना लांडेंनी मात्र डीजेच्या तालावर ताल धरला होता. विजयी जल्लोषात त्यांना कसलेच भान राहिले नाही. त्यावरून आता त्यांच्यावर सोशल मीडियात टीकाही होऊ लागली आहे. त्यांचा लंगोटवरील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विजयी जल्लोष न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतेक मतमोजणी केंद्रांवर अनेक ठिकाणी विजयानंतरही विजयी उमेदवार जल्लोष करताना आढळून आले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, ७३ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com