

Solapur, 09 February (उमेश पवार) : सोलापूर जिल्हा परिषद आणि बार्शी पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय आघाडीला ‘व्हाईट वॉश’ देत चारीमुंड्या चीत केले. जिल्हा परिषदेच्या सर्व सहा, तर पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व बारा जागा जिंकत आमदार सोपल यांच्या आघाडीच्या खेळीला धोबीपछाड दिली आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पंचायत समितीवर सलग पाचव्यांदा सत्ता मिळविली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व सहाच्या सहा आणि पंचायत समितीच्या १२ पैकी बारा जागा जिंकून राऊतांनी इतिहास घडविला आहे. पंचायत समितीत आता विरोधकही उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद आणि बार्शी पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांनी भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी केली होती. त्या आघाडीत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी यांचा समावेश होता, त्यामुळे भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेनेसह सर्वपक्षीय एकत्र आल्याने त्याची चर्चा राज्यभर झाली होती.
विशेषतः दोन्ही शिवसेनेला याबाबत नामुष्कीला तोंड द्यावे लागले होते. मात्र, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सर्वपक्षीयांना एकत्र करून तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न आमदार दिलीप सोपल यांनी केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आलेले नाही. विशेष म्हणजे बार्शी पंचायत समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सलग पाचव्यांदा सत्ता मिळविली आहे.
बार्शीतील जिल्हा परिषदेच्या गटातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार व कंसात मते
उपळाई ठोंगे : दीपक वैद्य (१७४५०)
पांगरी : रेश्मा डोके (१७८६०)
उपळे दुमाला : भारती दराडे (१५४५)
पानगाव : नंदकुमार काळे (१६५१६)
मालवंडी : सुजाता डोईफोडे (१६६६९)
शेळगाव (आर) : सोनाली बोधले (१४१४८)
बार्शी पंचायत समितीच्या बारा जागांवरील विजयी उमेदवार व कंसात मते पुढीलप्रमाणे
उपळाई ठोंगे : मीनाक्षी मुरलीधर रोंगे (८८८४०)
आगळगाव : सुरेखा वालचंद मुंडे (७८९८)
पांगरी : शरद वसंत बसवंत (८०४१)
कारी : किरण घुले (९१४८)
उपळे दुमाला : ऐश्वर्या रणजीत महानवर (९६९४)
गौडगाव : संजय भड (७८३५)
बावी : राजेंद्र सुरवसे (८१०८)
पानगाव : भीमा गव्हाणे (७९२३)
मालवंडी :विमल रामलिंग काटे (६६८५)
सासुरे : संतोष चंद्रकांत निंबाळकर (८०७९)
मानेगाव : जयमाला भाऊसाहेब जाधव (६६५५)
शेळगाव (आर) : सविता विश्वनाथ साबळे (७४९४)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.