NCP
NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election : पंढरपुरात ११ पैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; पुळूजवाडीत महाडिकांना धक्का, परिचारकांची बाजी

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchayat) सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वर्चस्व मिळविले आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) केवळ चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवता आली आहे. (NCP dominates 7 out of 11 Gram Panchayats in Pandharpur)

पंढरपूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले होते. पंढरपूर येथील तहसील कार्यालयात आज सकाळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये तुंगत, मेंढापूर या मोठ्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे, तर दुसरीकडे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना धक्का बसला आहे. त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या लगतच्या पुळूजवाडी ग्रामपंचायतीवर विरोधी परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे.

तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित, कल्याणराव काळे, भगिरथ भालके यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. भाजपच्या परिचारक गटाच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने ही सत्ता खेचून आणली आहे.

तालुक्यातील एकूण ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, भगिरथ भालके यांच्या गटाने सर्वाधिक सात ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. भाजप पुरस्कृत माजी आमदार प्रशांत परिचारक गटाला केवळ चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविता आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT