Gopichand Padalkar, Ajit Pawar
Gopichand Padalkar, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Padalkar Vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर टोळी, आज ना उद्या संपणार! ; पडळकरांचा घणाघात

संभाजी थोरात

Gopichand Padalkar on NCP : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नव्हे तर एक टोळी आहे. हा पक्ष फुटणार नाही तर आज ना उद्या संपणार आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सांगलीतील विटा या ठिकाणी आमदार पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावरही तीव्र शब्दात निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस एक टोळी असल्याचा उल्लेख केला. हा पक्ष फुटणार नाही तर संपणार आहे. तसेच अजित पवार यांनी बारामती मतदार संघातील दुष्काळी गावांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही लगावला.

पडळकर म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थापनेपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते आजपर्यंत बदलले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा अजेंडा देखील नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक टोळी आहे. हा पक्ष फुटणार नाही, तर आज ना उद्या संपेल."

राष्ट्रवादी पक्षानंतर त्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे वळविला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या ते बारामती मतदार संघातून लाखांच्या मताने निवडून येतो, या विधानाचा समाचार घेतला. यावर पडळकर म्हणाले "लाखांच्या मताने निवडून येत असाल, तर बारामती तालुक्यातील 44 गावे ही पाण्यापासून वंचित का आहेत? दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून या गावांची पाण्याची टँकर देण्याची पहिली मागणी असते. याच्या विचार अजित पवारांनी केला पाहिजे."

महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे बघावं, असा टोलाही आमदार पडळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT