Ambadas Danve : आमची युती परिवर्तन घडवेल ; भाजपने चिंता करू नये..

Shivsena : प्रकाश आंबेडकरांना कमी लेखू नका, ते विचारांनी आणि नात्याने बाबासाहेबांचे नातू आहेत.
Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News, Jalna
Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News, JalnaSarkarnama

Jalna : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली. (Vanchit Bahujan Aghadi)वंचित-शिवसेना युतीमुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. तर या युतीवर सत्ताधारी टीका करत आहेत.

Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News, Jalna
Shivsena-VBA Alliance : वंचितच्या साथीने शिवसेना पुन्हा उभारी घेणार ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी ज्या प्रकाश आंबेडकरांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला, त्यांच्याच बरोबर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) युती केल्याची टीका केली. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची युती महाराष्ट्रात परिवर्तन घडवेल, त्यामुळे तुम्ही आमची चिंता करू नका, असा टोला लगावला आहे.

अंबादास दानवे म्हणाले, आमची चिंता तुम्ही करु नका, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेली युती ही राजकीय लाभासाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी आहे. भाजप आणि ओवेसी यांची युती आहे हे बिहार, उत्तर प्रदेश निवडणुकीवरून दिसले आहे. भाजप बी टीम म्हणून एमआयएमला वापरत आलेली आहे.

प्रकाश आंबेडकरांना कमी लेखू नका, ते विचारांनी आणि नात्याने बाबासाहेबांचे नातू आहेत. वैचारिक वाद असू शकतात, म्हणून ते कायम ठेवायचे का? राजकिय परिवर्तन म्हणून नाही तर सामाजिक परिवर्तन म्हणून ही युती करण्यात आली आहे. निश्चितच ही युती महाराष्ट्रात परिवर्तन घडवेल, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीला उमेदवार देखील मिळणार नाही या बावनकुळे यांच्या टिकेला, आमच्या पक्षाची चिंता तुम्ही करू नका, अशा शब्दात दानवेंनी उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com