Sindhudurg : भाजप - शिवसेना भिडली; कणकवलीच्या कनेडी बाजारपेठेत तुफान राडा

Politics : पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र...
Sindhudurg :
Sindhudurg :Sarkarnama

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कनेडी गावात भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यात राडा झाला आहे. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या पूर्व संध्येला कणकवलीत राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

सकाळी नितेश राणे (Nitesh Rane) समर्थक भाजप (BJP) पदाधिकारी व शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या सतीश सावंत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. याचा राग मनात ठेवत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यानंतर कनेडी बाजारपेठेत तुफान राडा झाला.

Sindhudurg :
Dilip Walse News : माझ्या गृहमंत्रीपदाच्या काळात असे काही घडलेले नाही..

यावेळी शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले. तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर येथील परिस्थिती पाहता पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली. मात्र, तरीही भाजप कार्यकर्त्ये आक्रमक झालेले होते.

Sindhudurg :
Politics : सुजय विखेंचा भलताच कॉन्फिडन्स; म्हणाले, लोकसभेला प्रतिस्पर्धी कोण याचा विचार करत नाही

सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी कनेडी बाजारपेठेत तणावाचे वातावरण आहे. तर कालही (ता.23 जानेवारी) कणकवलीत भाजपचे (BJP) कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचे बंधू गटनेते सुशांत नाईक यांच्यात भर रस्त्यात धक्काबुक्की झाली होती.

Sindhudurg :
BARTI News : 'बार्टी'च्या महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती,गजभियेंची तडकाफडकी बदली

त्यामुळे कणकवली तालुक्यात सध्या भाजप विरूद्ध शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कणकवली तालुक्यातील कनेडी गावात भाजप-शिवसेना आमने-सामने आल्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com