NCP Vs Congress
NCP Vs Congress  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Vs Congress : '' आघाडीत राष्ट्रवादीच मोठा पक्ष...''; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची अजितदादांच्या विधानाला सहमती

सरकारनामा ब्यूरो

Solapur : आता आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवण्याची चिन्हं आहे. तसेच १६ १६ १६ चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र, संजय राऊतांनी ठाकरे गट लोकसभेच्या १९ जागा लढवणार असल्याचा दावा करत आघाडीत खळबळ उडवून दिली. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचा दावा केला होता. यावरुन आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी आज (दि.२२) सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. तर काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे काही विधान करण्यात चुकीचं नाही. पण, अशा वक्तव्यांना फारसं महत्वं नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्यं करण्यात येतात असं चव्हाण यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे हे विधान चुकीचं नाही.

चव्हाण म्हणाले, आता ठाकरे गटात फक्त १६ आमदार उरले आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेट करत असतात, त्यात गैर काही नाही. राष्ट्रवादी(NCP) एक असेल तर काँग्रेस दोन नंबरचा आणि उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष आहे. त्याचमुळे अजित पवारांच्या विधानात चुकीचं असं काही नाही.

''आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही...''

अजित पवार(Ajit Pawar) यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही, त्यांनीही गर्व करू नये. आम्ही नेहमी मोठे होतो. मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो. आम्ही मोठे भाऊ असा काँग्रेसने कधीच असा घमंड केला नाही. अजितदादांना काय बोलायचं काय नाही यावर मी बोलणार नाही असं नाना पटोले म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT