Sameer Wankhede News: शाहरुख खानशी झालेल्या व्हॉट्सॲप चॅटवरून समीर वानखेडे अडचणीत; एनसीबीने नोंदवला आक्षेप

Aryan Khan Case- CBI : शाहरुख खानशी झालेल्या व्हॉट्सॲप चॅट शेअर केल्याप्रकरणी समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता.
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आर्यन खान ड्रग्जप्रकरणी 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची 'सीबीआय' चौकशी करत आहे. समीर वानखेडे यांची शनिवारी पाच तास तर रविवारी पुन्हा तब्बल तीन तास चौकशी झाली. मात्र, त्यानंतर समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्स व्हायरल झाले होते.

आता याच व्हॉट्सॲप चॅट्सवरून वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्सवर एनसीबीने आक्षेप नोंदवला आहे.

समीर वानखेडे यांनी त्यांचे आणि शाहरुख खान यांच्यातील संभाषणाचे व्हॉट्सॲप चॅट्स शेअर केल्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याचं एनसीबीचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sameer Wankhede
Sameer Wankhede News: समीर वानखेडेंची 'सीबीआय'कडून तीन तास चौकशी; 'या' प्रश्नांची उत्तरं वानखेडेंनी टाळली?

एवढंच नाही तर वरिष्ठांना न कळवता तपास अधिकाऱ्याने (समीर वानखेडे) आरोपीच्या (आर्यन खान) वडिलांशी (शाहरुख खान) केलेल्या संभाषणावर देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेचा व्हॉट्सॲप चॅट्स महत्वाचा भाग आहे.

Sameer Wankhede
Aryan Khan Case : आर्यनला अटक केल्यानंतर वानखेडे-शाहरूख यांच्यातलं WhatsApp चॅटींग आलं समोर..

दरम्यान, आर्यन खान ड्रग्जप्रकरणी आर्यन विरोधात कारवाई न करण्याच्या बदल्यात 25 कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा गुन्हा वानखेडे यांच्यासह अन्य चौघांवर दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर सीबीआय वानखेडे यांची चौकशी करत आहे. त्यामुळे या चौकशीत आणखी काय माहिती समोर येते? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com