Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले,'सांगली'च्या उलट-सुलट चर्चेत माझा काय संबंध...?

Sangli Loksabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. परंतु ते सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाहीत. त्यामुळे...

Anil Kadam

Sangli News : सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीत कोणाला मिळेल, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. अद्याप जागावाटप झालेले नसताना सांगलीची काँग्रेसची जागा काढण्यात माझा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील कॉंग्रेस नेते करत आहेत. याबाबतच्या बेजबाबदारपणे केल्या जाणाऱ्या उलट-सुलट चर्चेशी माझा काहीही संबंध नाही, असा खुलासा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपुरात केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे. लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्व नेत्यांकडे आग्रह धरत आहे.

पण सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून पडद्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचा समाचार पक्षश्रेष्ठी घेतील. पण आता जनतेतून आवाज येत आहे. जनता सगळ्या डावांना ओळखून असल्याची टीका काँग्रेसवाले करत आहेत. अशा बेजाजबदारपणे केल्या जाणाऱ्या उलट-सुलट चर्चेशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मौन पाळणे पसंत केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. परंतु ते सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही जागावर शिवसेनेच्या गटाने दावा सांगितला आहे. परंतु सद्यःस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) निवडणूक लढविणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेची एक जागा कमी होत असून, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जात आहे, परंतु सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT