Shahu Maharaj : शाहू महाराजांनी महाआघाडीच्या चर्चेतील हवाच काढली; लोकसभा उमेदवारीबाबत म्हणाले...

Kolhapur Loksabha Constituency : तुतारी हे चिन्ह शरद पवार यांना मिळालेले आहे. तुतारी कायमच वाजत असते.
Shahu Maharaj
Shahu Maharaj Sarkarnama

kolhapur News : कोल्हापूर लोकसभेचा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार, याबाबत गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याला उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच श्रीमंत शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा महाविकास आघाडीकडून समोर आली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच कोल्हापूर दौरा झाला. आमदार सतीश पाटील यांच्या घरी झालेल्या डिनर चर्चेतही शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत भाष्य झाल्याची माहिती आहे. पण, त्यावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया देत या सर्व चर्चेची हवाच काढून घेतली आहे. (Loksabha Election 2024)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाने दावा केला आहे. महाविकास आघाडीकडे ही जागा कोणाकडे जाईल, याकडे लक्ष लागून राहिले आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे वडील शाहू महाराज यांचे नाव महाविकास आघाडीतून अचानक चर्चेत आले. (Mahavikas Aghadi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Maharaj
Solapur Mill Worker : मनोहर जोशींच्या ‘त्या’ निर्णयामुळे सोलापूरच्या गिरणी कामगारांची दिवाळी झाली गोड...!

गेल्या महिनाभरापासून श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव राज्यसभा ते लोकसभा उमेदवारीपर्यंत समोर आले. नुकताच शरद पवार यांचा दौराही पार पडला. पवार कोल्हापुरात येताच त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेत लोकसभेबाबत चर्चा केली. या भेटीने अनेक चर्चांना उधाण आले होते. (Kolhapur politics)

छत्रपती शाहू महाराज यांनी लोकसभेसंदर्भात सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. लोकसभेची उमेदवारी मला मिळाली तर अनेकांना आनंद होईल, यात प्रश्नच नाही. महाविकास आघाडीचा अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही. हा फॉर्म्युला निश्चित होण्यात काही अडचण येणार नाही. पण, मला अजून ऑफरच आलेली नाही. ऑफर येण्याची शक्यता आहे, असे सांगत शाहू महाराज यांनी आजपर्यंत झालेल्या चर्चेची हवाच काढून घेतली.

Shahu Maharaj
Manohar Joshi : मुख्यमंत्री मनोहर जोशींनी महापौर फडणवीसांना काय मागितले होते...?

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण सगळे मिळून वाटचाल करूयात, असे सांगून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नवीन चिन्हावरही प्रतिक्रिया दिली. तुतारी हे चिन्ह शरद पवार यांना मिळालेले आहे. तुतारी कायमच वाजत असते. सगळीकडे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये, चांगल्या वेळेस तुतारी, तिथे असतेच अशा शब्दांत त्यांनी सूचक वक्तव्य केले.

Shahu Maharaj
Manohar Joshi News : आमदाराची राजीनाम्याची धमकी अन्‌ मुख्यमंत्री जोशींनी सिंचन योजनेचे थेट भूमिपूजनच केले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com