Manohar Sapate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अटकेच्या भीतीने राष्ट्रवादीचे नेते सपाटे झाले गायब; शिक्षिकेकडून अत्याचाराची फिर्याद

संस्थेतील विधवा शिक्षिकेला नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरूध्द फौजदार चावडी पोलिसांत झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : संस्थेतील विधवा शिक्षिकेला नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा सोलापुरातील (Solapur) राष्ट्रवादीचे (NCP) माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्याविरूध्द फौजदार चावडी पोलिसांत (Police) झाला आहे. सपाटेंवर आता अटकेची कारवाई अटळ असून ते पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. (NCP leader Manohar Sapate absconding due to fear of arrest)

दरम्यान, संबंधित शिक्षिका माझ्या बहिणीसारखी असून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली जात आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करावा, असे सपाटेंचे म्हणणे आहे.

तुझ्याशी विवाह करतो; म्हणून सपाटे यांनी अत्याचार केला. शाळेत व इतर ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचेही संबंधित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. विरोध केल्यास संस्थेतून काढून टाकीन, बदनामी करेन, खोट्या गुन्ह्यात अडकवतो, अशीही धमकी सपाटेंनी दिली, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे.

शाळेत एकदा हाताला धरून त्यांच्या कार्यालयात ओढून नेताना, त्यांना विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हाही दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. इच्छा नसतानाही राजीनामा लिहून घेतला. सेवानिवृत्तीचे पैसे देण्यासाठी दहा लाख रूपये खंडणी मागितली. शेतजमीन विकलेले नऊ लाख रुपये आणि स्वत:जवळचे एक लाख रूपये सपाटेंना दिले, असेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक विकास देशमुख तपास करीत आहेत.

पोलिस लागले कामाला

पीडितेच्या फिर्यादीनुसार सपाटेंनी शाळेत सेवानिवृत्तीची रक्कम देण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी घेतली. ही रक्कम पीडितेने कोणत्या बॅंकेतून काढली, शेतजमीन कधी विकली होती, याची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी अत्याचार केला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना ते पुरावे त्यासोबत जोडले जातील, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

छत्रपती शिवाजी हायस्कूलचे संस्थापक मनोहर सपाटे यांनी १५ ऑगस्ट १९९३ ते २८ जून २०२२ या काळात त्यांच्या संस्थेतील एका विधवा शिक्षिकेवर वारंवार अत्याचार केला. शाळेत, शिवपार्वती लॉजवर, वसंत विहारमधील पत्रा शेडमध्ये अत्याचार केला, असे पीडितेचे म्हणणे आहे. ज्ञानदानाच्या पवित्र मंदिरात अत्याचार करणाऱ्या सपाटेंना तत्काळ अटक करा आणि संस्थेवर तत्काळ प्रशासक नेमा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. पण, संबंधित शिक्षिका माझ्या बहिणीसारखी असून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली जात आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या मुळाशी जावून सखोल तपास करावा, असे सपाटेंचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT