अमेठी जिंकली तिथं मोहोळची काय कथा : भाजप जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टींचं विधान

जिथे भाजप कमी आहे, त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालणार आहे. पुढचा मोहोळचा आमदार हा भाजपचाच असेल.
Sachin Kalyanshetti
Sachin KalyanshettiSarkarnama
Published on
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) : भारतीय जनता पक्षाच्या बाबत (BJP) अक्कलकोट आणि मोहोळची परिस्थिती सारखीच आहे. मोहोळ मागे का राहिले, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. भाजप हा कुठल्याही नेत्यावर अवलंबून नाही. अमेठी जिंकली तिथं मोहोळची काय कथा. मात्र, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सेवा पंधरवाडा ही एक मोठी संधी त्यासाठी आहे, असे अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी सांगितले. (BJP will win Mohol assembly seat : Sachin Kalyanshetti)

आमदार कल्याणशेट्टी भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर ते प्रथमच मोहोळ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कल्याणशेट्टी यांनी वरील विधान केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी तालुक्यातील विविध कामाचा व सद्य परिस्थीतीचा आढावा घेतला.

Sachin Kalyanshetti
जित गये...! ही तर विजयाची नांदी; सर्वोच्च न्यायालयातही लढाई जिंकू : शिवसेनेची प्रतिक्रिया

जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी म्हणाले की, मोहोळ हा लढवय्यांचा व संघर्षाचा वारसा असलेला तालुका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात येणाऱ्यांचे स्वागतच आहे. जिथे भाजप कमी आहे, त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालणार आहे. पुढचा मोहोळचा आमदार हा भाजपचाच असेल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

Sachin Kalyanshetti
इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसने लावला निर्मला सीतारामन यांच्या ‘स्वागता’चा बॅनर!

याच बैठकीत अनेकांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी आणला. मात्र, रस्ते आहे तसेच आहेत, अशी तक्रार केली. त्यावर जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी त्या कामाचा जो कोणी ठेकेदार असेल, त्याच्या कामाची चौकशी लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी माजी मंत्री ढोबळे, विजयराज डोंगरे, सुनील चव्हाण, शंकर वाघमारे, बिराजदार यांची भाषणे झाली. या वेळी भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश घोडके, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sachin Kalyanshetti
शरद पवारांच्या टीकेला सीतारामन यांनी बारामतीत येऊन असे दिले उत्तर

भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी मोहोळ तालुका हा विकासा पासून कोसो दूर आहे. खासदार फंडातून रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा. सत्ताधारी तोंडे बघून निधी देत आहेत, असा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com