Makarand Patil - Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti's Minister Dispute : राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटलांचा जयकुमार गोरेंना टोला; ‘मी काय दोन-तीन हजारांनी निवडून येत नाही’

Makarand Patil Vs Jaykumar Gore : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्‍ये शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 24 August : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे फोडाफोडीला वेग येत आहे. महायुतीमध्ये एकमेकांचे नेतेमंडळी खेचाखेची सुरू झाली असून नेतेमंडळीही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे.

जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या माण मतदारसंघातील माणचे नेते अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या तोंडावर गोरे आणि मकरंद पाटील यांच्यात हा वाद रंगला आहे. गोरे यांनी पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन टीका केली होती. त्याला मंत्री मकरंद पाटील यांनी उत्तर देताना आपण दोन तीन हजारांनी निवडून येत नाही, असा टोला लगावला आहे.

जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील (Makarand Patil ) यांच्या खंडाळा-वाई मतदारसंघातील कार्यक्रमात त्यांच्यावर टीका केली होती. ‘बाभळीच्या झाडाखाली कोणीही उभे राहत नाही, प्रत्येकाला आंब्याचीच सावली लागते. तालुक्याचे राजकारण बदलविण्याची ताकद बावधन गावात आहे. आजची सभा ही परिवर्तनाची आहे,’ असे सूचक विधान गोरे यांनी केले होते.

मंत्री गोरे यांनी केलेल्या टीकेला मंत्री पाटील यांनी खोचक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. जयकुमार गोरे हे त्यांचा भारतीय जनता पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवत आहोत.

वाई मतदारसंघातील जनता मला नेहमीच वाढीव मताधिक्याने निवडून देते. मी काही दोन ते तीन हजारांनी निवडून आलेलो नाही, असा टोला मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचे नाव न घेता लगावला.

महायुती सरकारमधील सातारा जिल्ह्यांमधील नेत्‍यांमध्‍ये एकमेकांना डिवचण्‍यासाठी निमित्त साधले जात असल्‍याचे दिसून येत आहे. त्यातूनच गोरे आणि पाटील यांनी एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्‍ये शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT