Sushilkumar Shinde : ‘एका पराभवाने फार काय बिघडत नाही; आम्ही तीन-तीन पराभव पचवले आहेत’

Solapur Congress News : एखाद-दुसरा प्रसंग सोडला तर आम्ही खूप सुखाने नांदलेले लोक आहोत. पण, नव्या लोकांना अतिशय कष्टाने काम करावे लागणार आहे.
Sushilkumar Shinde
Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 August : विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी फार काय बिघडत नाही. आम्ही तीन-तीन पराभव पचवून बसलेले आहोत. काँग्रेस पक्षाची 1978 आणि 1974 मध्येही अशीच परिस्थिती होती. त्याही वेळी काँग्रेसला कार्यकर्ते मिळत नव्हते. पण, आपल्या सर्व सहकाऱ्यांनी काम करून पुन्हा काँग्रेस उभी केली. कोणी बोललं म्हणून काँग्रेस संपत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस भवनात नवे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) बोलत होते. ते म्हणाले, देशातील अठरा पगड जातींनी काँग्रेस पक्षाला उभे राहण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. आपला दोनदा पराभव झाला, ठीक आहे. पण, पंडीत नेहरु यांच्या विचारांनुसार आपल्याला पुन्हा उभं राहायचं आहे.

सोलापूर काँग्रेसला (Solapur Congress) अनेक जिल्हाध्यक्ष लाभले. पण, कणखर अध्यक्ष बोटावर मोजण्याइतकेच लाभले आहेत. माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासारखा अध्यक्ष ‘लाठीगोली खाएंगे, फिर इंदिरा को लाएंगे’ अशी तुमची घोषणा होती, त्या वेळी. आम्ही त्यावेळी थोडावेळ बाजूला गेलो होतो. बाजूला म्हणजे काँग्रेसवालेच होतो. पण, मी शरद पवार यांच्यासोबत गेलो होतो. परत काँग्रेससोबत आलो. सोलापुरात काँग्रेसशिवाय दुसरं काही चालू शकत नाही, असेही शिंदे म्हणाले.

Sushilkumar Shinde
Sadabhau Khot : गोपीचंद पडळकरांबाबत बोलताना सदाभाऊ खोतांना अश्रू अनावर; म्हणाले, ‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ह्या माणसासोबत राहणार...’

माजी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सध्या काळ बदलला आहे. पण, काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बदलेली नाही. सर्वधर्मसमभाव आपण कोठेही बिघडू दिलेला नाही. जातीयवादी व्यवस्थेकडे आपण ढुंकनही पाहिलेले नाही. काँग्रेस पडते आणि पुन्हा उभे राहते. तत्वाशी कधीही तडजोड केलेली नाही.

Sushilkumar Shinde
Ajitdada on Dattatray Bharne : अजितदादांचा कृषिमंत्री भरणेंना भरसभेत इशारा; ‘आता तुझ्या साक्षीनं सांगितलंय, तुझं काही निघू देऊ नको’

काँग्रेस पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांना आता खूप काम करावं लागणार आहे. एखाद-दुसरा प्रसंग सोडला तर आम्ही खूप सुखाने नांदलेले लोक आहोत. पण, नव्या लोकांना अतिशय कष्टाने काम करावे लागणार आहे. मोठ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मोठ्या उत्साहाने ते पद स्वीकारलेले आहे. तुम्हाला रात्रंदिवस काम करावं लागेल. तुम्हाला काँग्रेस वाढवावी लागेल, असा सल्लाही सुशीलकुमार शिंदेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com