Yashwant Mane
Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP MLA News : राष्ट्रवादीच्या आमदाराला sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; राजस्थानमधून एकाला अटक

सरकारनामा ब्यूरो

Pune News : मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार (MLA) यशवंत माने (Yashwant Mane) यांना sextortion च्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२३ मध्ये आमदार माने यांच्या मोबाईल क्रमांकावर एक अश्लील मेसेज आला. अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भूरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी त्यांना देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागितली. (NCP MLA Yashwant Mane from Solapur in the trap of sextortion; One arrested from Rajasthan)

मिळालेल्या माहितीनुसार, माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सायबर चोरट्यांनी आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडिया वरुन मिळवला. त्यांना अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना भूरळ पडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पुण्यातील सायबर पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासून तो राजस्थानमधील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या जिल्ह्यांत ७ दिवसांसाठी तळ ठोकून एकाला अटक केली आहे.

रिझवान खान (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत ८० जणांना असे फोन केले आहेत. हे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून आत्तापर्यंत ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपीला अटक करुन पुण्यात आणल्यानंतर आमदार माने आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

मी कुणीशीही बोललो नाही : यशवंत माने

दरम्यान,‘मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ ७०-८० मेसेज करण्यात आले होते. एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती, त्यामुळे मी ही तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती, असे आमदार यशवंत माने यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT