NCP Morcha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Morcha News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारला इशारा, शरद पवार गटाकडून...

Vishal Patil

NCP NEWS : सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. महाविकास आघाडीतील ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवार गट जास्त सक्रीय नसल्याची चर्चा होती. मात्र या सगळ्या चर्चा खोट्या ठरवत कराडमध्ये शरद पवार गटाकडून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारला इशाराच दिला.

सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप करत ईव्हीएम हटाव देश बचाव, अशा घोषणा शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून देण्यात आल्या. राज्यात आज युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच त्रस्त आहेत. त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांचे नुकसान होऊनही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही. शेतमालाला भाव नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च सरकारकडून दरवर्षी कमी-कमी केला जात असल्याची घणाघाती टीका माजी सभापती देवराज पाटील यांनी केली. 

कराड तालुक्यातील शरद पवार गटाच्या वतीने काढलेल्या मोर्चात माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती देवराज पाटील, नंदकुमार बटाणे प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक प्रश्न आणि अडचणी नागरिकांना भेडसावत आहेत. त्या सोडवण्या ऐवजी सरकार जातीय वाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहे, असा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात बेरोजगारी प्रकल्प गुजरातला

सरकारच्या वतीने राज्यात नवीन प्रकल्प आणण्यात येत नाहीत. पण महाराष्ट्राच्या वाट्याचे, हक्काचे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत.अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सरकारने दिलासा दिला नाही. युवकांच्या हाताला काम नाही. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT