Abhijeet Patil Meet Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics: मोदींच्या सभेपूर्वी पवारांच्या निकटवर्तीय नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

Abhijeet Patil Meet Devendra Fadnavis : सत्ताधारी भारतीय जनता पक्षात जाऊन काही दिलासा मिळतो आहे का, याचीही चाचपणी होताना दिसत आहे. त्यामुळेच शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 April : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठी घटना घडली असून, ती पवारांना धक्का देणारी आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळे अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सिद्ध झाले आहे.

राज्य सहकारी बॅंकेचे 430 कोटी रुपयांची थकबाकी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे आहे. बॅंकेच्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या प्रकरणात पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई करत तीन गोदामे सील केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी कारखान्याचे संचालक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अभिजित पाटील यांना देण्यात आले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षात (BJP) जाऊन काही दिलासा मिळतो आहे का, याचीही चाचपणी होताना दिसत आहे.

त्यामुळेच शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अभिजित पाटील यांनी यासंदर्भात आम्ही अजून कोणताही निर्णय घेतला नाही, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अभिजित पाटील हे रविवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. मात्र, अकलूजच्या सभेला उशीर झाल्याने ही भेट आज सकाळी ठरली होती. त्यानुसार पाटील यांनी नरेंद्र मोदी यांची सभा होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बालाजी सरोवर येथे जाऊन भेट घेतली.

त्या भेटीतील तपशील समजू शकला नाही. मात्र, राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईतून वाचविण्यासाठी अभिजित पाटील यांचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार मोदी यांची सभा होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा मासा गळाला लावल्याचे दिसून येते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT