Solapur, 28 April : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंड करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारीवर निवडणूक लढवत आहेत. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्ये आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकलूजमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभा घेत आहेत. त्या सभेला रणजितसिंह मोहिते पाटील हे जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
माढ्यातून लोकसभेला डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील जयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्जही भरला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना मोहिते पाटील कुटुंबीयांमध्येही मतभेद होते, हे तेव्हाही दिसून येत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या व्यासपीठावर जात आहेत. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (RanjitShinh Mohite Patil) हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे सांगितले जात होते. तसे जयसिंह मोहिते पाटील यांनीही जाहीरपणे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मदत केली आहे, त्यामुळे आपण भाजपसोबत राहू, असे त्यांचे मत होते, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले होते. त्यानुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आजही भाजपमध्ये आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये असले तरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात ते कुठेही दिसत नाहीत. तसे ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारातही कुठे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रणजितसिंह मोहिते पाटील हे अलिप्त आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी अनेकांना गूढ आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अकलूजमध्ये निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा होत आहे. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे अगदी त्यांच्या अंगणात ही सभा होत आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या सभेला रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थिती लावणार का, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.