ShahajiBapu Attack Mohite Patil : मोहिते पाटील आता मैदानात सापडलेत, त्यांना सोडायचं नाही; शहाजीबापूंचा हल्लाबोल

Madha Loksabha Election 2024 : मोहिते पाटील यांचे दोन्ही कारखाने कर्जात गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले. त्यांनी मदत केली नसती, तर ते आपल्याच बॅंकेकडे कर्ज मागायला येत होते. फडणवीसांनी मोहिते पाटील यांनी खुराक दिला, आता उठून बसल्यावर फडणवीसांविरोधात दंड थोपटत आहेत.
ShahajiBapu Patil
ShahajiBapu PatilSarkarnama

Solapur, 28 April : मोहिते पाटील यांनी गेली ४० वर्षे ह्या शहाजीबापूला चिंध्या चिंध्या करून घरात बसवलं. ते मोहिते पाटील आता मैदानात सापडले आहेत. त्यांना आता सोडायचं नाही. मोहिते आज सापडले आहेत, त्यांना सोडाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे, तुम्हाला. अजिबात सोडायचं नाही. सगळ्यांनी मिळून दणका द्यायचा, अशा शब्दांत आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सांगोला येथे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत आमदार पाटील यांनी मोहिते पाटील आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, पाणी फक्त शिवसेना भाजपच्या लोकांना मिळणार आहे का. शेकापची लोकं पाणी घेणार नाहीत का. फडणवीसांनी दिलेले पाणी आम्ही घेणार, आम्ही स्वाभिमानी आहोत, हे डॉ. अनिकेत आणि बाबासाहेब देशमुख यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना सांगावं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ShahajiBapu Patil
Ranjitshinh Mohite Patil : अकलूजमधील फडणवीसांच्या सभेला रणजितसिंह मोहिते पाटील जाणार का?

शेकापवाले सगळं आमच्याकडून घेतात आणि निवडणुकीत तुतारी म्हणतात. शरद पवारांनी भल्याभल्यांना एकटं सोडलं. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. आमच्या सांगोल्याचा वनवास एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संपवला. त्यामुळे सुखानं सगळं चाललं आहे, तुम्ही काही बिघडू नका, असे आवाहन शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केले.

मोहिते पाटील यांचे दोन्ही कारखाने कर्जात गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले. त्यांनी मदत केली नसती, तर ते आपल्याच बॅंकेकडे कर्ज मागायला येत होते. फडणवीसांनी मोहिते पाटील यांनी खुराक दिला, आता उठून बसल्यावर फडणवीसांविरोधात दंड थोपटत आहेत. मोहिते पाटील जिकडं गेलेत, तिकडं सगळं त्यांनी मोडीत काढलं आहे. डीसीसी बॅंकेचे एका घराने १३०० कोटींचे कर्ज घेतले आणि बुडवून टाकले. त्यामुळे आज जिल्हा बॅंकेचे कर्ज सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. जिल्हा दूध संघही त्यांनी बंद पाडला, असा आरोप शहाजी पाटील यांनी केला.

ShahajiBapu Patil
Fadnavis On Mohite Patil : पवारांसोबत जाण्याचा निर्णय मोहिते पाटील कुटुंबीयांतील सर्वांना पटलेला नाही; फडणवीसांनी संधी साधली

ते म्हणाले, सांगोला तालुक्याला भाजप आणि शिवसेनेने दिले आहे. मोहिते पाटील यांनी सांगोला तालुका वाळवंट करून उद्‌ध्वस्त केला होता. दीपक साळुंखे यांच्या सहकार्याने मी आमदार झालो. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्याला पाणी दिले. पाच कारखान्यांना पुरेल एवढा ऊस या सांगोला तालुक्यात नाही लावला तर राजाराम पाटील हे बापाचे नाव मी लावणार नाही. कुठल्याही गावांत तुम्हाला ऊस, डाळिंब, सीताफळांचे मळे दिसतील.

गुवाहाटीला गेलो म्हणून पाच हजार कोटींचा निधी मिळाला

मी गुवाहाटीला कशाला गेलो होता, हे बाकीच्यांना माहिती नसेल पण तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली असली तरी भाजप आणि सांगोला राष्ट्रवादीची मला गेल्या निवडणुकीवेळी मदत झाली हेाती. एवढं करूनही आम्ही घासून जिंकलो. आमची लढाई गणपराव देशमुख यांच्याशी नव्हती. त्यांना पराभूत करायचं असं आमचं म्हणणं नव्हतं. पण आमच्या सांगोल्याला पाणी आणायचं होतं. गुवाहाटीला गेलो म्हणून सांगोल्याला पाच हजार कोटींचा निधी आला. गद्दारी आम्ही केली नाही. उद्धव ठाकरे हे तर निवडूनही आले नव्हते. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे आमच्या मनात खंत होती.

ShahajiBapu Patil
Devendra Fadnavis Sabha : शिंदे-सावंत कुटुंबाच्या एकीचे बळ मतांमध्ये दिसलं पाहिजे; देवेंद्र फडणवीसांची ताकीद

माझ्या नादाला लागू नका

शरद पवारांवर आम्ही प्रमाणिक श्रद्धा ठेवली, त्यांनी आम्हाला काय दिले. पवारांनी सांगितलेला एक शब्द खरा झाला तर मी राजकारण सोडेन. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरात महादेव आणून सोडला, तर तीन तासांत राक्षस होऊन वर जाईल, असे ते आहात. माझ्या नादाला लागायच्या भानगडीत पुन्हा पडू नका. आम्ही जीभ आवळून धरली आहे. जर मोहिते पाटील पुन्हा निवडून आले तर सांगोला तालुक्याने पाणी त विसरावे. रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले तर एक एकर तुमचं कोरडं ठेवणार नाही.

मोहिते पाटील डोक्यातून निघेनात

बोलण्याच्या ओघात शहाजी पाटील हे रणजितसिंह मोहिते पाटील यांना निवडून द्यायचं आहे, असे बोलून गेलं. व्यासपीठावरील लोकांनी त्यांना निंबाळकर अशी आठवण करून देताच मोहिते ४० वर्षे माझ्या मागं लागलेत, डोक्यातूनच निघेनात. तिच्या..... दमवून टाकत आहेत मोहिते....’ अशी टीका त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर केली.

ShahajiBapu Patil
Sarode Question to Nikam : सर, हरणारी केस आपण का घेतली? : ॲड सरोदेंचा निकमांना भाजपच्या उमेदवारीवरून खोचक सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com