Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Ladki Bahin Yojana : 'आता 'लाडक्या बहि‍णीं'साठी लढणार, पैसे कसे बंद करतात तेच पाहतो'; जयंत पाटील कडाडले

Jayant Patil on Ladki Bahini Yojana : राज्य सरकारच्या माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या पडताळणीत लाभार्थी अपात्र करण्याची कारवाई सुरू आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत राज्यात सीएम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे राज्यात भाजप महायुती सरकारमध्ये आले. परंतु या योजनेमुळे सरकारवर आर्थिक एवढा आला की, ही योजना चालू राहणार की बंद पडणार, यावरून चर्चा सुरू आहे.

अर्जांची पडताळणी सुरू आतापर्यंत पाच लाख लाभार्थांचा लाभ बंद केल्याचे सांगितले जात आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, महायुती सरकारवर टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या योजनेच्या लाभ बंद करण्यावरून इशारा दिला आहे.

जयंत पाटील यांनी महायुती (Mahayuti) सरकारला इशारा देताना, सीएम लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार, यासाठी येथून पुढे आपला लढा सुरू राहील. लाडकी बहि‍णींसाठी पैसे बंद होणार नाही, यासाठी आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुका-तालुका पातळीवर लढाई उभारणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, "आता आम्ही लाडक्या बहिणीची (CM Ladki Bahin Yojana) बाजू घेऊन काम करणार आहोत. लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार आहे. लाडक्या बहिणींनो आम्ही तुमच्या मागे आहोत".

'लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिला आहे, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मतं दिली आहेत, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का?', अशा खोचक शब्दात जयंत पाटील यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.

अनेक योजनांचे लाभ रखडले

सीएम लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभ योजनेचा आहे. या योजनेमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आला आहे. याशिवाय इतर सरकारी योजनांवर लाडकी बहीण योजनेचा ताण आला आहे. संजय निराधार, श्रावणबाळ, शेतकरी योजनांचे अनुदान, रोजगार हमी योजनेंवरील मजुरांचे अनुदान, अशा इतर योजनांचे अनुदान रखडले असल्याचे समोर आले आहे.

लाडकींची संख्या 25 लाखांच्या आत येणार

महायुती सरकारमधील मंत्री देखील खासगीत या योजनेमुळे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे सांगतात. यातून राज्य सरकारने या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे. यामुळे आतापर्यंत पाच लाखांवर अनेक लाभार्थ्यांचा लाभासाठी अपात्र झाले आहेत. ही योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 25 लाखांच्या खाली येईल, असा अंदाज विरोधकांनी वर्तवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT