Aaditya Thackeray : 'केजरीवालांसारखाच माझा पराभव करण्याचा भाजपचा होता प्लॅन' ; आदित्य ठाकरेंचा दावा!

Aaditya Thackeray on BJP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचे कारण सांगितले.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray Politics News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत आपचे नेते अरविंद केजरीवाल कसे पराभूत झाले याबाबत खळबळजनक दावा केला. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना देऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्ता काबीज केली. आता याच योजना कशा बंद पडणार आहेत, याबाबत मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

आमदार आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) हे 'सकाळ माध्यम समूह'च्या मुंबईतील साम मराठी कार्यालयात 'कॉफी वुईथ सकाळ' ह्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. आमदार ठाकरे यांनी यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. देशासह राज्याच्या बदलत्या राजकारणावर, त्यातून लोकशाहीला आणि संविधानाला निर्माण झालेल्या धोक्यावर भाष्य केले.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : भाजपमुळे महाराष्ट्रविरुद्ध गुजरात; आदित्य ठाकरेंचा संताप

''आप'चे नेते अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या दिल्ली विधानसभा मतदारसंघात 37 हजार मतदारांची नावे रद्द करण्यात आली होती. तोच प्रयोग माझ्याबाबत मुंबईतील वरळी मतदारसंघात झाला होता.परंतु ग्राउंड पातळीवर काम केले असल्याने माझा विजय सोपा झाला आणि विरोधक तोंडघशी पडले', असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? आदित्य म्हणाले, 'बिनशर्ट...'

लाडकी बहीण योजना बंद होणार -

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहते की नाही राहत, याबाबत मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. "या योजनेचे काय झाले, यावर सरकार संभ्रम निर्माण करत आहे. उत्तर द्यायला तयार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर ही योजना पूर्णपणे बंद पडेल. शिवभोजन योजना बंद पडायच्या मार्गावर आहे. तीर्थयात्रा योजना देखील जवळपास बंद होताना दिसते आहे", असे आमदार ठाकरे यांनी म्हटले.

वैयक्तिक लाभाच्या योजना EVM घोळ लपवण्यासाठी.... -

'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुका होऊ द्या. ईव्हीएम(EVM) मशीन असू द्या किंवा त्यातील मतांचा घोळ असू द्या, यात काहीतरी लपवण्यासाठी ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना भाजपने आणल्या आहेत. आता याच याच योजना सुरू ठेवायच्या की नाही ठेवायच्या याबाबत, संभ्रम निर्माण केला जात आहे, यातूनच पुढे या योजना बंद होतील', असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com