Jayant Patil,Dr. Suresh Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Political News : तब्बल चौदा वर्षानंतर जयंत पाटील भाजपच्या नेत्याच्या कारखान्यावर; काय आहे कारण

Jayant Patil जयंत पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेत कामकाजाच्या चर्चा केल्या.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास आज सोमवारी भेट दिली. तब्बल चौदा वर्षानंतर आमदार पाटील यांनी साखर कारखान्यास भेट देत गळीत हंगामाबाबत चर्चा केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदिश जगताप व संचालक मंडळाने त्यांचे स्वागत केले.

कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रालगत प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघ आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आज सकाळी एका हॉस्पिटलचा जयंत पाटील Jayant Patil यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते.

हा कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री. पाटील यांनी कृष्णा कारखान्यास धावती भेट दिली. कारखान्याच्या मीटिंग हॉलमध्ये श्री. पाटील यांचा डॉ. भोसले यांनी सत्कार केला. त्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेतला.

कारखान्याचे गळीत कसे चाललेय, कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण क्षमतेने सुरू आहे का ? यासह कामकाजाच्या चर्चा केल्यानंतर ते मतदारसंघातील पुढील कार्यक्रमांसाठी रवाना झाले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पाटील, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, कृष्णेचे संचालक धोंडिराम जाधव, कार्यकारी संचालक राम पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT