Pune News : पुण्याचे आयुक्त विक्रम कुमारांचा मुक्काम वाढला; दादांशी घेतलं जुळवून?

Vikram Kumar : ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यानंतर विक्रम कुमार यांची बदली होणार होती.
Vikram Kumar, Ajit Pawar
Vikram Kumar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

PMC Commissioner Vikram Kumar : पुणे महापालिकेचा कारभार सांभाळणारे आयुक्त विक्रम कुमार यांचा मुक्काम आणखी वाढला आहे. युती सरकारमध्ये सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांनी जुळवून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. साडेतीन वर्षांपूर्वी जुलै 2020 मध्ये पालिकेत दाखल झालेले विक्रम कुमार किमान सहा महिने तरी पुण्यातच थांबणार असल्याचे समजते.

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन भारतीय जनता पक्षाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यानंतर विक्रम कुमार (Vikram Kumar) यांची बदली होणार होती. मात्र, ती झाली नाही. या वर्षीही ते जाणार असल्याची चर्चा आहे. पण, आताही ते आणखी सहा महिने तरी हलण्याची शक्यता नाही, असे समजते.

Vikram Kumar, Ajit Pawar
DCM Ajit Pawar: दादांनी वेळ दिल्याने सहा हजार नागरिकांचं स्वप्न पूर्ण होणार; 'म्हाडा'च्या लाॅटरीला अखेर मुहूर्त

पालिका आयुक्त असलेल्या विक्रम कुमार यांची बदली होऊ नये, यासाठी शहरातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओळख दाखविली. त्यामुळे एका वर्षासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना दिलासा मिळाला. या बदल्यात भाजपच्या या पदाधिकाऱ्याने वर्षभर आयुक्तांकडून विविध कामे करून घेतली. नियोजनबद्ध पद्धतीने अतिशय शांतपणे ही सर्व कामे करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा गट घेऊन बाहेर पडलेले अजित पवार हे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाचीदेखील जबाबदारी देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जुळवून घेणाऱ्या विक्रम कुमार यांनी दादांशीदेखील जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे.

Vikram Kumar, Ajit Pawar
Hand Grenade In Baner : बाणेर परिसरात सापडले हातबॉम्ब; पुण्यात खळबळ

अजितदादांना पाठिंबा असणारे नगरसेवक काम घेऊन पालिकेत आल्यास प्राधान्याने त्यांची कामे कमीत कमी वेळेत कशी मार्गी लागतील, याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे आयुक्त काम करत नाहीत, या तक्रारी दादांकडे जाणे बंद झाले आहे. दादांशी जुळवून घेत त्यांच्या गटातील नगरसेवकांची कामे मार्गी लावणे, असेच धोरण सध्या त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. यामुळे आयुक्तांचा पुण्यातील मुक्काम वाढण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

(Edited By - Rajanand More)

Vikram Kumar, Ajit Pawar
Harshvardhan Patil : "बारामतीसाठी अद्याप सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चाच नाही"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com