Jayant Patil :''राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा येणार सुगीचे दिवस '' ; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास!

NCP News : ''निवडणूक आय़ोग शरद पवारांकडून त्यांचा पक्ष काढून घेणार नाही, कारण...'' असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad news : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर सांयकाळी आले होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाला शहरात पुन्हा पूर्वीचे सुगीचे दिवस येतील,असा आशावाद व्यक्त केला. तसेच, केंद्रीय निवडणूक आय़ोग शरद पवारांकडून त्यांचा पक्ष काढून घेणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

२०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत होती. त्यानंतर प्रथमच ती त्यावर्षी भाजपकडे केली. दरम्यान,पाच महिन्यापूर्वी राष्ट्रवादी फुटली. त्यानंतर शहरातील बहूतांश पक्ष हा अजित पवारांसोबत गेला आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील(Jayant Patil) यांनी पुन्हा पक्षाला उद्योगनगरीत सुगीचे दिवस येतील,असा विश्वास व्यक्त केला आहे, हे विशेष.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil
NCP News : ''भाजपच्या गाळात 'ते' रुतणार आहेत, त्यांना...'' ; शरद पवारांचं आमदार, खासदारांच्या बैठकीत विधान!

शहरातील जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाला शहरात चांगली परिस्थिती असल्याने पूर्वीचे दिवस नक्की येतील,असं पाटील म्हणाले. शहरातील अनेकजण संपर्कात असून घरवापसीच्या तयारीत असणाऱ्यांचे स्वागत केले जाईल,असे त्यांनी सांगितले.

अजित पवार, छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL), हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करूनही भाजपने त्यांना मंत्री केले यावर बोलताना त्यांनी सूज्ञास अधिक सांगणे न लगे असे एका ओळीत उत्तर देऊन त्यातून वाद निर्माण होणारा हा विषय संपवला.

तुम्ही मंत्रीमंडळात जा,मी राजीनामा देतो,असे पवारांनी सांगितले होते,असे वक्तव्य अजित पवारांनी आज केले. त्यावर काय सांगाल असे विचारले असता शरद पवारांनी त्याचे समर्पक उत्तर आजच पुण्यात दिले आहे. तसेच हा त्या दोघांतला संवाद असून त्यावर तिसऱ्याने (मी) भाष्य करणे योग्य आणि आवश्यक वाटत नाही,असे पाटील यांनी सांगत हा वादाचा दुसरा प्रश्नही खुबीने टोलवला.

Jayant Patil
Sharad Pawar : शरद पवारांनी अजितदादांचे आरोप चोवीस तासांत खोडले

मुली या वंशाचा दिवा आहे, हे अजित पवारांनी शरद पवारांच्या रोखाने केलेले वक्तव्य ही टीका नसून कौतूक आहे. मुलाची वाट न पाहता एका मुलीवर थांबण्याचा निर्णय पवारांनी त्यावेळी घेतला, हे कौतुकास्पद आहे,असे पाटील यांनी सांगत हा प्रश्नही पॉझीटीव्हली घेतला.

चिन्ह कुणाला मिळेल,असे विचारले असता,निवडणूक आय़ोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीत पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला असल्याची बाजू आमच्या वकिलांनी मांडली आहे.त्यामुळे त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला जाणार नाही,असे उत्तर पाटील यांनी दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com