Jayant Patil-Mahesh Kote
Jayant Patil-Mahesh Kote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंतरावांचा सोलापूर दौरा : कोठेंना राखीव वेळ; तर चंदेलेंकडे रात्रीचे भोजन!

प्रमोद बोडके

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) सोमवारी (ता. २१ फेब्रुवारी) व मंगळवारी (ता. २२ फेब्रुवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते विधानसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक घेणार आहेत. सोमवारी ते सोलापुरात मुक्काम करणार असून या दौऱ्यात त्यांनी माजी महापौर महेश कोठे (mahesh kothe), माजी महापौर नलिनी चंदेले, राष्ट्रवादीच्या सहकार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र हजारे यांच्यासाठी त्यांनी खास वेळ दिला आहे. (NCP state president Jayant Patil visit to Solapur; Reserved time given for Mahesh Kothe)

सोमवारी सकाळी १० वाजता सांगोला विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक सांगोल्यातील रामकृष्ण व्हिला येथे होणार आहे. दुपारी १२ वाजता पंढरपुरातील तनपुरे महाराज मठात पंढरपूर मतदार संघाची आढावा बैठक होणार आहे. महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड यांच्याकडे पंढरपुरात ते स्नेहभोजन करणार आहेत.

विठ्ठल रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन ते दुपारी तीन वाजता पिंपळनेर (ता. माढा) येथील स्नेहल मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पावणे सहा वाजता मोहोळमधील घाटोळे मंगल कार्यालयात होणाऱ्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.

रात्री आठ वाजता सोलापुरात त्यांचे आगमन होणार असून राष्ट्रवादीच्या सहकार व्यापार-उद्योग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र हजारे यांच्याकडे ते भोजनासाठी जाणार आहेत. सोलापुरात मुक्काम करून मंगळवारी सकाळी नियोजन भवन येथे जलसंपदा विभागाची ते आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी ११ वाजता सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात सोलापूर ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी साडेबारा ते एक हा वेळ त्यांनी महेश कोठे यांच्यासाठी राखीव ठेवला आहे.

दुपारी दोन वाजता अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची ते आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी चार वाजता सोलापूर शहर कार्यकारिणीची आढावा बैठक ते हेरिटेज लॉनमध्ये घेणार आहेत. त्यानंतर ५ वाजता शहर दक्षिण, ६ वाजता शहर मध्य, सात वाजता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. रात्री आठ वाजता ते भोजनासाठी माजी महापौर नलिनी नलिनी चंदेले यांच्याकडे जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT