BJP
BJPsarkarnama

भाजपचे सरचिटणीस राष्ट्रवादीच्या वाटेवर; पदाचा दिला राजीनामा!

भाजपचे सोलापूर शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांचा राजीनामा;पक्ष सोडताना खच्चीकरण होत असल्याचा केला आरोप

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षांच्या नावाने त्यांनी राजीनामा पत्र भाजपच्या कार्यालयात दिले आहे. (BJP's Solapur city general secretary Bijju Pradhan resigns his post)

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) मार्गावर असलेले बिज्जू प्रधाने यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा रितसर राजीनामा शुक्रवारी भाजप कार्यालयात दिला आहे. गेल्या पंचवार्षिकला त्यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपच्या तिकीटावर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती. बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक गणेश पुजारी व प्रधाने यांच्यात काट्याची लढत झाली होती. यामध्ये प्रधाने यांना 4 हजार 127 मते मिळाली होती. तर पुजारी यांना 4 हजार 212 मते मिळाली होती. केवळ 85 मतांच्या फरकाने प्रधाने यांना परभवाला सामोरे जावे लागले होते.

 BJP
राष्ट्रवादीच्या डोळसे वैरागच्या पहिल्या नगराध्यक्ष; निरंजन भूमकर उपनगराध्यक्ष!

दरम्यान, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सुरू असलेल्या भाजप पक्षांतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीने वाट मोकळी करून दिल्याने प्रधाने यांनी भाजपचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 BJP
मोहिते पाटील गटाचा नगराध्यक्ष झाला; पण राष्ट्रवादीनेच गुलाल उधळला...

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर सरचिटणीसपदाच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना बिज्जू प्रधाने यांनी सांगितले की, मी 1995 पासून भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाने मला अनेकवेळा युवा मोर्चा, पक्षाचे सरचिटणीस आणि गतनिवडणुकीत नगरसेवकपदाचे तिकीट देऊन संधी दिली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात पक्षातून मला पाठबळ देण्याऐवजी माझे खच्चीकरण करण्यात येत असल्याचे मला दिसून आले आहे. त्यामुळे मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com