सत्ताधाऱ्यांना जिल्हा दूध संघ लुटायचाय : बळीराम साठेंचा घाणाघात!

दूध पंढरीची निवडणूक : यंदाच्या निवडणुकीतून संघ हातात घेऊन पुन्हा त्याच सत्ताधाऱ्यांना संघ लुटायचा आहे.
 Baliram Sathe
Baliram SatheSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : गेल्या वीस ते तीस वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या (महाआघाडी) ताब्यात सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (दूध पंढरी, Dudh Pandhari) असताना हा संघ कर्जबाजारी का झाला?, यंदाच्या निवडणुकीतून संघ हातात घेऊन पुन्हा त्याच सत्ताधाऱ्यांना संघ लुटायचा आहे. दूध उत्पादकांना वाचविण्यासाठी नव्हे; तर लुटण्यासाठी ते एकत्रित आले आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांनी केला. (Dudh Pandhari Election: NCP District President Baliram Sathe criticizes ruling party leaders)

 Baliram Sathe
भाजपचे सरचिटणीस राष्ट्रवादीच्या वाटेवर; पदाचा दिला राजीनामा!

जिल्हा दूध संघ बचाव समितीच्या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज (ता. १८ फेब्रुवारी) अक्कलकोट येथे झाला. त्या प्रचारसभेत साठे बोलत होते. बळीराम साठे म्हणाले की, जिल्हा दूध संघ वाचवायचा असेल, तर बचाव पॅनेललाच विजयी करा. सत्ताधाऱ्यांना दूध उत्पादकाशी काहीही घेणे-देणे नाही. त्यांना फक्त संघाच्या मालमत्ता बळकावायच्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 Baliram Sathe
मोहिते पाटील गटाचा नगराध्यक्ष झाला; पण राष्ट्रवादीनेच गुलाल उधळला...

गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात आपण दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. यापुढेही आपण सत्याच्या बाजूने उभे राहू, असा विश्‍वासही जिल्हाध्यक्ष साठे यांनी व्यक्त केला. या वेळी सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल आवताडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे तसेच संजय पोतदार, कांचन घाडगे, अरुण लोंढे, रमजान नदाफ, बापूसाहेब शिंदे, विठ्ठल इंगळे, चंद्रकांत पाटील, हैदर केंगार यांच्यासह इतर दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com