मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाचे जाहीर आणि सार्वजनिक पैलू स्पष्ट करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कसे असंविधानिक आहे, याचा पर्दाफाश करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस उद्यापासून (ता. २९ मे) करणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (NCP will publicly read out the verdict on the power struggle in Maharashtra)
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन भाजपचे मदतीने सरकार बनविले. शिवसेना पक्षाच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांना आपत्र करण्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकताच निकाल दिला आहे. वास्तविक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टी असंविधानिक घडल्या असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही शिंदे गट सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने असल्याचे सांगत आहे.
भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ आणि वस्तुस्थिती याबाबत सामान्य जनतेला माहिती व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पुढाकर घेतला आहे. त्यातून उद्यापासून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सविस्तर विश्लेषण सर्वसामान्यांना समाजावे, यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोमवारी (ता. २९ मे) दुपारी अडीच वाजता 'चला या, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया' याा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या पुढाकाराने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादामध्ये शिंदे गटाच्या पक्षप्रतोदाची ठरवलेली अवैध नेमणूक, पक्षांतर बंदीचा कायदा आणि राज्यपालांनी घटनेच्या बाहेर जाऊन केलेले वर्तन यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या निकालाची कायदेशीर आणि संविधानिक बाजू समजावून सांगण्याची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर असणार आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
जयंत पाटलांची संकल्पना राष्ट्रवादी राज्यभर राबविणार
जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, सरकारची वैधता आणि सरकारमधील नैतिकता याबाबतची जनजागरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.