रमेश धायगुडे
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या (Lonand Nagar Panchayat) निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बाजी मारली. राष्ट्रवादीने एकूण १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत नगरपंचायतीत निर्विवाद सत्ता मिळवली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसला ३ जागा व भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. एक जागेवर अपक्ष विजयी झाला असून, शिवसेनेला मात्र यावेळीही खाते उघडता आलेले नाही. भाजपचे जेष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस माजी नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, खंडाळा तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष व अॅड. बाळासाहेब बागवान यांचे पुत्र सर्फराज बागवान, माजी नगरसेवक कुसूम शिरतोडे, शिवसेनेचे नेते विश्वास शिरतोडे, भाजपचे प्रदीप क्षीरसागर यांना पराभावाला धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला आहे.
लोणंद नगरपंचायतीची दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एकूण १६ हजार ७४५ मतदारांपैकी १२ हजार ३२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ७४ टक्के मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली आज सकाळी लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मतमोजणीस सुरवात झाली.
सहा-सहा प्रभागांच्या दोन व पाच प्रभागांची एक अशा तीन फेऱ्यांत दोन तासांत मतमोजणी झाली. प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत बोडरे व शिवसेनेचे विश्वास शिरतोडे यांच्यात काँटे की टक्कर झाल्याने दोन्ही उमेदवारांना ३२७ अशी समसमान मते पडली. अखेर ईश्वर चिठ्टीवर राष्ट्रवादीचे भरत बोडरे हे विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा मिळवून सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला -३, भाजपला-३ व अपक्ष -१ असे संख्याबळ आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार (पक्ष)
प्रभाग - १ : दिपाली संदीप शेळके ( भाजप)
प्रभाग २ : आसिया साजीद बागवान ( काँग्रेस)
प्रभाग ३ : दिपाली निलेश शेळके ( काँग्रेस)
प्रभाग ४ : सचिन नानाजी शेळके ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग ५ : भरत शंकरराव शेळके ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग ६ : राजश्री रवींद्र शेळके (अपक्ष)
प्रभाग ७ : मधुमती कैलास पलंगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग ८ : ज्योती दिपक डोणीकर ( भाजप)
प्रभाग ९ : शिवाजीराव शंकरराव शेळके - पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग १० : सीमा वैभव खरात (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग : ११ : भरत जयवंत बोडरे ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग १२ : रशिदा शब्बीरभाई इनामदार ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग १३ : तृप्ती राहुल घाडगे ( भाजप)
प्रभाग १४ : सुप्रिया गणेश शेळके ( राष्टूवादी काँग्रेस)
प्रभाग १५ : गणीभाई जूसूफ कच्छी (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग १६ : प्रविण बबनराव व्हावळ ( काँग्रेस)
प्रभाग १७ : रवींद्र रमेश क्षीरसागर ( राष्ट्रवादी काँग्रेस)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.