Mahabaleshwar Panchayat Samiti Sabhapati  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahabaleshwar Politic's : महाबळेश्वरमध्ये मकरंदआबा अन्‌ शिंदेसेनेची दोस्ती; राष्ट्रवादीकडे सभापतिपद, तर शिवसेनेचा उपसभापती

Panchayat Samiti Sabhapati Election : महाबळेश्वर पंचायत समितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. सभापतिपदी शकुंतला चोरमले आणि उपसभापतिपदी संजय मोरे बिनविरोध निवडले गेले, त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली.

रविकांत बेलोशे

Mahabaleshwar, 16 March : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ​महाबळेश्वरमध्ये पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणामुळे वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समसमान जागा मिळाल्याने कोणाची सत्ता येणार, याची उत्सुकता शिगेला पोचली होती. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. सभापतिपदी राष्ट्रवादीच्या शकुंतला रमेश चोरमले, तर उपसभापतिपदी शिवसेनेचे संजय मोरे यांची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भगवा फडकला आहे.

महाबळेश्वर पंचायत समितीच्या (Mahabaleshwar Panchayat Samiti) चार जागांपैकी शिवसेनेला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. तळदेव गणातून संजय शेलार, तर वाडा कुंभरोशी गणातून संजय मोरे हे शिवसेनेचे दोन पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. मेटगुताड गणातून शकुंचला चोरमले, तर भिलार गणातून वंदना या विजयी झाल्या होत्या, त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणाचा होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. मात्र, सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने महाबळेश्वरमध्ये मिले-जुले राजकारणाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

सुरुवातीला समसमान संख्याबळामुळे निवडीचा पेच चिठ्ठीवर सुटणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पक्षांनी समन्वयाची भूमिका घेतली. आरक्षणाच्या तांत्रिक बाबीमुळे सभापतिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले, तर अनुभवी नेतृत्व म्हणून उपसभापतिपदाची धुरा शिवसेनेच्या संजय मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.

शिवसेनेचा पहिला उपसभापती

​महाबळेश्वर तालुक्याच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आज पहिल्यांदाच उपसभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. संजय मोरे यांच्या रूपाने शिवसेनेने पंचायत समितीच्या सत्तेत वाटा मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT