Nitesh Rane|
Nitesh Rane|  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : आता आम्ही अॅक्शन मध्ये

सरकारनामा ब्युरो

Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडी राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही कारणे देत बसणार नाही. आता आम्ही अॅक्शनमध्ये आहोत, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी दिला.

श्रीरामपूर तालुक्यातील दीपक बर्डे या युवकाच्या अपहरण घटनेला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी दीपकचा तपास अजूनही लागलेला नसल्याने हिंदुत्त्ववादी संघटनांनी श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढला होता. या संदर्भात अहमदनगरमधील शासकीय विश्रामगृहावर आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी मंत्री अशोक उईके, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नितेश राणे म्हणाले, श्रीरामपूरमधील एका हवालदाराचे आरोपींशी लागेबांधे आहेत. आरोपींकडून हवालदाराला हप्ते मिळतात. पोलिसांना आम्ही रक्षक म्हणून पाहतो. ते गुन्हेगारांबरोबर आर्थिक व्यवहार करायला लागले. पोलिस आरोपींना वाचवत असतील, तर मी सांगतो. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिलेले नाही. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. हसन मुश्रीफ पालकमंत्री नाहीत. हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. राज्यात मुख्यमंत्री हे हिंदुत्त्ववादी एकनाथ शिंदे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री कडवट हिंदुत्त्ववादी देवेंद्र फडणवीस आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोणत्या अधिकाऱ्याला वाटत असेल की महाविकास आघाडीचा नेते त्यांना वाचवेल तर त्यांचा फोन घेणारा कोणीही राहिलेला नाही. त्यांचे फोन आम्हाला लागणार नाहीत. महाविकास आघाडीचे काही माजी मंत्री तुरुंगातमध्ये आहेत. हिंदू समाजाच्या नादी कोणीही लागू नये. आम्ही घेतलेली सर्व माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही देणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्या पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोपींची लागे बांधे आहेत. हे शोधू काढावे अन्यथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात येईल. सीआयडीकडून या प्रकाराची चौकशी व्हावी. आता बोललो पुढचा टप्पा अॅक्शनचा असेल, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT