Eknath Shinde-Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde On BJP Minister : एकनाथ शिंदेंनी भाजप मंत्र्याला सुनावले : सरकारी पैशावर कोणी अधिकार सांंगू नये; ते जनतेचे आहेत, याची जाणीव ठेवा

Bhagirath Bhalake Join Shivsena : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या निधीवर शेतकरी आणि जनतेचा पहिला हक्क असल्याचे सांगत जयकुमार गोरेंवर अप्रत्यक्ष टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 12 April : महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला हक्क हा माझ्या बळीराजाचा, शेतकऱ्यांचा आहे. मग माझा लाडक्या बहिणींचा आहे, त्यामुळे सरकारच्या पैशावर कोणीही अधिकार सांगू नये, हे पैसे जनतेचे आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १२ एप्रिल) नगराध्यक्षा प्रणिता भालके, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत, विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे बोलत होते.

‘पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी नगरपालिका निवडणुकीत निधी कुठून मिळविणार, असे प्रश्न विचारले होते,’ असे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणापूर्वी भगीरथ भालके यांनी सांगितले होते. तोच धागा पकडून शिंदे यांनी भाजपचे मंत्री गोरे यांना टोला लगावला.

शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या तिजोरीवर राज्यातील जनतेचा अधिकार आहे. इथं आमचा काही अधिकार नाही. आम्ही मालक नाही, तर सेवक आहोत. तुम्ही जनता मालक आहात. तुम्ही ठरवता कोणाला उचलायचं आणि कोणाला पटकावायचं. महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला हक्क हा माझ्या बळीराजाचा, शेतकऱ्यांचा आहे. मग माझा लाडक्या बहिणीचा आहे. त्यामुळे सरकारच्या पैशावर कोणीही अधिकार सांगू नये, हे पैसे जनतेचे आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

मुख्यमंत्री असताना एवढा निधी दिला, त्याची भूमिपूजनं आणि लोकार्पण सोहळे अजूनही सुरू आहेत. पण कधी या हाताचं त्या हाताला कळू दिलं नाही. मला काय मिळालं या पेक्षा या जनतेला काय मिळालं हे बघा, असेही शिंदे यांनी जयकुमार गोरे यांना सुनावले.

कशाला पाहिजे ऑपरेशन टायगर?

सध्या ऑफरेशन टायगरची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावर भाष्य केले. कशाला पाहिजे ऑपरेशन टायगर, एकदा केले तेच लोकांच्या अजून लक्षात आहे. सत्ता, खुर्ची हा आपला अजेंडा नाही तर लोकसेवा हाच आपला अजेंडा आहे. तुम्ही लोकांची कामं करा तुमच्या पाठीशी शिवसेना आणि मी खंबीरपणे उभा आहे, असेही ते म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT