

Pandharpur, 12 April : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची एकच विनंती आहे, तानाजी सावंत यांनी 2018-2019 मध्ये ज्या प्रमाणे सोलापूरमध्ये लक्ष घातले, तसे पुन्हा एकदा त्यांना सोलापूरमध्ये लक्ष घालायला सांगा. शिवसेनेचे पाच ते सहा आमदार निवडून आले, असे आजच जाहीर करतो, अशा शब्दांत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांना सोलापूरच्या राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली.
पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील यांनी तानाजी सावंत यांना सोलापूरकडे लक्ष देण्याची विनंती केले.
ते म्हणाले, तानाजी सावंत तुम्ही जे धाराशिवला जाऊन बसलात ते आम्हाला सापडेनातसुद्धा झाला आहात. या जरा सोलापूरला, तुमचं हे घर (सोलापूर) आहे. तिकडं सासरवाडी (धाराशिव) आहे, माहेर (सोलापूर) इकडं आहे. आई-बापाचं प्रेम इथं आहे.
राजकीय जीवनात मला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने एकमेव आधार मिळाला आहे. भगीरथ भालके यांचा शिवसेनेत प्रवेश व्हावा, यासाठी आम्ही गेली दोनेक वर्षे प्रयत्न करत होतेा. मात्र, आपल्याच काही लोकांनी वावड्या उठवून भालकेंचा प्रवेश रोखण्याचे काम केले, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला.
ते म्हणाले, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना एवढंच सांंगतो की, दोन वर्षांत एकट्या सांगोला तालुक्याला साडेपाच हजार कोटी रुपये मिळत असतील, तर पंढरपूरला काय मिळेल, याचा विचारसुद्धा तुम्ही करू शकणार नाही. एकनाथ शिंदे यांनी निधीसाठी आलेल्या कागदावर न वाचता सह्या केल्या आहेत. तळागाळ्यातील लोकांसाठी ते रात्रंदिवस कष्ट करणारे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आज आमच्या बहिणींना महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. ज्योती वाघमारे यांना राज्यसभा सदस्य करण्याचा निर्णय तुमचा सर्वांत मोठा राजकीय निर्णय आहे, असे मी मानतो. भालके आणि सावंत यांचा शिवसेना प्रवेश सोलापूरच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. सोलापूरमध्ये 1995 मध्ये शिवसेनेचे जे वैभव होतं, ते पुन्हा आपल्याला दिसून येईल, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
पंढरपूरचा गुलाल अन् प्रणिता भालकेंऐवजी प्रणिती शिंदेंचा उल्लेख
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ‘पंढरपूरचा गुलाल ज्यांचा हाती आहे,’ असे अनिल सावंत असा उल्लेख केला. याचवेळी बोलताना शहाजीबापूंनी पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके असा उल्लेख करण्याऐवजी आमची कन्या प्रणितीताई शिंदे असा नामोल्लेख केला. त्यामुळे व्यासपीठावर चांगलीच खसखस पिकली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.