नागपूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayashree Jadhav) तर भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांच्यात मुख्य लढत आहे. आता संतोष बिसुरे आणि अस्लम सय्यद या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेर 15 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. कोल्हापूर उत्तरचा कौल यापैकी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये अर्ज माघारीची मुदत काल (ता.28) दुपारी 3 वाजेपर्यंत होती. काल संतोष बिसुरे आणि अस्लम सय्यद या दोघांनी माघार घेतली. कोल्हापूर उत्तरच्या मैदानात आता एकूण 15 उमेदवार आहे. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला होणार असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी महसूल विभागाच्या 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबर मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूर उत्तरच्या मैदानातील उमेदवार
जयश्री जाधव (काँग्रेस), सत्यजित कदम (भाजप), यशवंत कृष्णा शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी), विजय श्यामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहिद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी) आणि अपक्षांमध्ये सुभाष वैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत ऊर्फ संभाजी भोसले, मनिषा मनोहर कारंडे, अरविंद भिवा माने, मुस्ताक अजीज मुल्ला, करुणा धनंजय मुंडे, राजेश ऊर्फ बळवंत सत्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे या उमेदवारांचा समावेश आहे.
कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.