Sambhaji Raje Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Raje's Big Statement : संभाजीराजेचं सूचक अन्‌ मोठे विधान, ‘आता माझं महाराष्ट्रापेक्षा देशावर लक्ष’

Rahul Gadkar

kolhapur News : स्वराज्य पक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज (ता. ११ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. त्यानिमित्त संभाजीराजे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीची आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक विधान केले. सध्या संभाजीराजे हे लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे सूचक विधान कोणासाठी होते? हा उत्सुकतेचा विषय आहे. गेली दहा दिवसांपासून आपण संपर्क क्षेत्राबाहेर होता, असा प्रश्न केल्यानंतर मात्र त्यावर संभाजी राजे यांनी बोलणे टाळले. ('Now my focus is on country rather than Maharashtra': Sambhaji Raje)

नाशिकहून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या भावी मुख्यमंत्री या पोस्टरवरून संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया देताना, ‘महाराष्ट्र माझं कार्यक्षेत्र आहे. गेली पंधरा वर्षे मी महाराष्ट्रभर फिरतोय. आता महाराष्ट्रापेक्षा देशात कसे जाता येईल, याकडे माझे लक्ष आहे,’ असे सूचक विधान पुन्हा एकदा केले आहे. (Sambhaji Raje's Big Statement )

वाढदिवसाला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊनच विविध कार्यक्रमाला सुरुवात करतो. यंदाही वाढदिवसाला देवीकडे काही वेगळे मागितलेले नाही. लोकांची सेवा माझ्या हातून व्हावी, हेच देवीकडे मागतो.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या एक टक्के तरी मी जनतेची सेवा करू शकलो, तर माझं जीवन सार्थक होईल, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

यंदाचे वर्ष हे निवडणुकीचं असणार आहे. यावर बोलताना संभाजी राजे यांनी, चांगल्या दिवशी, चांगल्या गोष्टी बोलाव्यात. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT