Miraj BJP Dispute : कामगारमंत्री खाडेंशी पंगा घेणे आले अंगलट; भाजप नेत्याला पदाला मुकावे लागले

Suresh Khade Vs Mohan Vankhande : पालकमंत्री सुरेश खाडे यांना आव्हान देऊ पाहणाऱ्यांची नावे जिल्हा नियोजन समितीच्या यादीतून वगळण्यात आली होती.
Mohan Vankhande-Suresh Khade
Mohan Vankhande-Suresh KhadeSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्याचे कामगारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावण्याच्या पवित्र्यात असलेल्या मोहन वनखंडे यांच्याकडून मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख हे पद काढून घेण्यात आले आहे. वनखंडे हे पालकमंत्री खाडे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये मतभेद सुरू आहेत. त्यांना हटवल्यानंतर या पदावर माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब धामणे यांची वर्णी लागली आहे. खाडेंना आव्हान देण्याचा प्रयत्न वनखंडे यांच्या अंगलट आल्याचे स्पष्ट झाले. (BJP leader who opposed Labor Minister Suresh Khade was Remove post)

मिरजेत भाजपमधील अंतर्गत राजकीय वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवरून त्याची सुरुवात झाली होती. पालकमंत्री सुरेश खाडे यांना आव्हान देऊ पाहणाऱ्यांची नावे जिल्हा नियोजन समितीच्या यादीतून वगळण्यात आली होती. (Miraj BJP Dispute )

Mohan Vankhande-Suresh Khade
Bharat Ratna Narasimha Rao : ‘भारतरत्न’ पी. व्ही. नरसिंहराव यांचे महाराष्ट्राशी काय होते कनेक्शन...?

आता मोहन वनखंडे यांना पदावरून हटवत वेगळी चूल मांडू इच्छिणाऱ्यांना खाडे आणि भाजपने अलगद बाजूला केले आहे. वनखंडे यांच्याकडील अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीसपद मात्र कायम ठेवले आहे.

वनखंडे यांना हटवल्यानंतर या पदावर माजी पंचायत समिती सभापती धामणे यांची निवड करण्यात आली आहे. धामणे हे पालकमंत्री खाडे यांचे विश्वासू मानले जातात. सध्या भाजपत दोन गट पडले आहेत. त्याचे दर्शन सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांतून होत आहे.

वनखंडे हे पालकमंत्र्यांचे विश्वासू होते. परंतु त्यांनी आता मिरज मार्केटमध्ये स्वतःचे स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात वनखंडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसते.

Mohan Vankhande-Suresh Khade
Kolhapur Politics : राजेश पाटलांनी अजितदादांसमोरच मेहुणे मंडलिकांना काढला चिमटा; ‘तेव्हा खासदार माझ्याविरोधात होते...’

गेल्या वर्षभरापासून ते स्वतंत्रपणे शक्तिप्रदर्शन करत आहेत. पालकमंत्र्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारून गर्दी खेचत शक्तिप्रदर्शन केले. वनखंडे यांनी प्रभू श्रीरामांची शंभर फुटी रांगोळी रेखाटून व साईनंदन कॉलनीतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून वेगळे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. या संघर्षाच्या पुढच्या टप्यात मिरज विधानसभा मतदारसंघात 'कटी पतंग' खेळ सुरू झाल्याची चर्चा आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Mohan Vankhande-Suresh Khade
Pandharpur-Mangalvedha Politics : परिचारकांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली; ‘आवताडेंना मी आमदार केलं, पक्षासाठी मी दोनदा माघार घेतली’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com