Balasaheb Patil, Srinivas Patil, Prithviraj Chavan, Atul Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Political News : गणेश दर्शनाचे निमित्त; कराडचे दिग्गज राजकीय नेते आले एकत्र...

Ganesh Darshan पहिल्यांदाच येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी कराडचे दिग्गज नेते मंडळी एकत्र आली होती, याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Political News : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपासून कऱ्हाड तालुक्यातील राजकीय नेत्यांची घडी विस्कटली आहे. ज्यांनी एकमेकांच्या साथीने निवडणुका लढवल्या ते कऱ्हाड दक्षिण आणि उत्तरचे आमदार बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले होते. या निवडणुकानंतर पहिल्यांदाच खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले हे नेते येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी एकत्र आले होते. सध्या त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कऱ्हाड तालुका Karad Taluka हा कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या दोन मतदारसंघातील विभागला आहे. कऱ्हाड दक्षिणवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचेच Congress वर्चस्व आहे, तर कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मध्यंतरी झालेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

त्या निवडणुकीत आमदार पाटील आणि आमदार चव्हाण गटाची जुळलेली नाळ तुटली. त्यावेळी आमदार पाटील यांना भाजपचे अतुल भोसले यांनी साथ दिली. त्या निवडणुकीत आमदार पाटील यांचा विजय झाला. दरम्यान, त्याचवेळी यापुढील सर्व सहकारी संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले गटाने एकत्रितपणे लढवाव्यात, अशी घोषणा त्या पॅनेलच्या ज्येष्ठांनी केली होती.

त्यानुसार कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार पाटील, अतुल भोसले यांनी संयुक्तपणे पॅनेल टाकून लढवली. त्यावेळी सत्ताधारी ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनीही स्वतंत्रपणे पॅनेल टाकून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांना माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी थेट प्रचारात उतरून साथ दिली.

त्या निवडणुकीत ॲड. उंडाळकर यांच्या पॅनेलचा विजय झाला. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संबंध ताणले गेले आहेत. त्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले हे नेते एकत्र आले होते.

खासदार पाटील 'कॉमन मॅन'

खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या वक्तृत्व शैलीतून आणि विकासकामांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याकडे विकासकामांची मागणी करण्यासाठी सर्वपक्षीय लोक जातात. त्यांच्याकडूनही गट-तट न पाहता विकासकामे दिली जातात, असे अनेकांचे अनुभव आहेत. त्यातच तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे राजकीय निवडणुकांतून संबंध ताणलेले असले तरी खासदार श्रीनिवास पाटील यांचे मात्र सर्वांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांच्याकडे 'कॉमन मॅन' म्हणून पाहिले जाते.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT