Nagar urban bank
Nagar urban bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर अर्बन बँकेसाठी केवळ 31.65 टक्के मतदान

Amit Awari

अहमदनगर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नगर अर्बन बॅंकेचे ( Nagar Urban Bank ) नवीन संचालक मंडळ निवडण्यासाठी काल मतदान प्रक्रिया झाली. 48 मतदान केंद्रांवर केवळ 31.65 मतदान झाले. त्यामुळे या मतदान प्रक्रियेवरच भागधारक मतदारांनी पाठफिरविल्याचे चित्र आहे. मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी ( ता. 30 ) होणार आहे. Only 31.65 per cent votes cast for Nagar Urban Bank

अर्बन बँकेत प्रशासक नियुक्त करावा व तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी अर्बन बँक बचाव कृती समितीने आंदोलने केली होती. त्यानुसार नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्त केले होते. तरीही एनपीए कमी होत नसल्याने रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार बँकेची निवडणूक जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली होती.

यात माजी खासदार (कै.) दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनल विरुद्ध अर्बन बँक बचाव समिती, अशी निवडणूक झाली. सहकार पॅनल भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांच्या, तर नगर अर्बन बँक बचाव समिती ही भाजपचे माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर व ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील निवडूक लढविली. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्बन बँक बचाव कृती समितीच्या चार जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकार पॅनलमधील चार जण बिनविरोध निवडून आले. त्यामुळे भागधारक मतदारांत निवडणुकी विषयी नाराजीचा सुरू होता, अशी चर्चा आज नगर शहरात आहे. नागरी बँक भागधारक हितसंरक्षक कल्याणकारी संस्थेच्या सदस्यांनी तर मतदान केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते.

नगर अर्बन बँकेत 18 संचालक असतात. त्यांतील चार जण बिनविरोध झाले. हे चौघेही संचालक सहकार पॅनलचे आहेत. उर्वरित 14 जागांसाठी काल मतदान झाले. बँकेचे 55 हजार 991 सभासद मतदार आहेत. त्यातील केवळ 17 हजार 721 मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. आज अहमदनगर जिल्ह्यातील 33, पुणे जिल्ह्यातील 6, नाशिक जिल्ह्यातील 2, औरंगाबाद 1, जालना 1, बीड जिल्ह्यातील 2, सोलापूर जिल्ह्यातील 1 तर गुजरात राज्यातील दोन असा 48 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली.

ज्यांनी चार वर्षे आंदोलन चालवले, त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार उभा करता आला नाही. हे दुर्दैवी आहे. याचा अर्थ अर्बन बँक बचाव कृती समितीचा भागधारकांशी संपर्क नव्हता. त्यांना पॅनल उभा करता आला नाही. बँक वाचविण्यासाठी लढणारे मान्यवर लोक निवडणुकीत उभे राहिले नाहीत. बँक बुडाली तर त्याला जबाबदार कोण?

- शशिकांत चंगेडे, अध्यक्ष, नागरी बँक भागधारक हितसंरक्षक कल्याणकारी संस्था.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT