Purshottam Jadhav, Som Prakash sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena : सातारा लोकसभेवर शिवसेनेचाच हक्क... 'युती'चा भगवा फडकणार... पुरूषोत्तम जाधव

केंद्रीय मंत्री Central Minister सोम प्रकाश Som Prakash यांनी पुढील चर्चेसाठी दिल्लीला Delhi Meeting भेटीचे निमंत्रण पुरूषोत्तम जाधव Purshottam Jadhav यांना दिले.

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यावर युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिंदे गट शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून सामोरे जाऊन सर्व निवडणूका जिंकण्याचा आमचा निर्धार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी केंद्रीय वाणिज्य, उद्योग मंत्री सोम प्रकाश यांना दिली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सोम प्रकाश हे संघटनात्मक बांधणीसाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे गट शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी त्यांची शिरवळ येथे भेट घेऊन शिरवळ ते पुणे असा प्रवास केला. जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

शिवसेना, भाजप युतीचे महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांचा सर्वसामान्यांशी संपर्क ठेवून धडाका लावला आहे. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असल्यानेजिल्ह्यातील रखडलेल्या विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी बारकाईने लक्ष देत आहेत. साडेतीनशे कोटी रुपयाचा विकास निधी त्यांनी साताऱ्यासाठी मंजूर केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यावर युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार केलेला आहे, असे सांगून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिंदे गट शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून सामोरे जाऊ, तसेच येणाऱ्या सर्व निवडणूका जिंकण्याचा निर्धार केला आहे, असल्याचे सांगितले.

सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये नवीन मोठे प्रकल्प आले पाहिजेत, या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी पुढील चर्चेसाठी दिल्लीला भेटीचे निमंत्रण पुरूषोत्तम जाधव यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT