Bjp News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics News : उपराष्ट्रपतींची नक्कल झोंबली; राहुल गांधींचा निषेध करत भाजप कार्यकर्ते आक्रमक

Rahul Gadkar

Maharashtra Politics Latest News : तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यावर व्यंग करून अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण काँग्रेस नेते राहुल गांधी करीत होते. या संपूर्ण प्रकरणानंतर देशभरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कृतीविरोधात कोल्हापूर भाजपच्या वतीने बिंदू चौक याठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत कल्याण बॅनर्जी, राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशविरोधी 'इंडिया' आघाडीचा धिक्कार असो, कॉंग्रेस सरकारचा धिक्कार असो, उपराष्ट्रपतींचा अवमान नही सहेगा हिंदुस्थान, पदाची नाही जाण आहे ही वैचारिक घाण, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

ज्या व्यक्तीला देशाचा द्वितीय नागरिक, महामहीम संबोधले जाते, ज्यांना राजशिष्टाचार, विशिष्ट प्रोटोकॉल असतो अशा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान होणे ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा भाजप तीव्र निषेध करीत आहे. देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात अशाप्रकारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा अपमान कधीही झाला नाही. यात दुर्देवाची बाब म्हणजे या सर्वांचे चित्रीकरण खुद्द राहुल गांधी करत आहेत, असे भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले.

कॉंग्रेसच्या हीन वृत्तीचा, खालच्या दर्जाचा विचार काँग्रेसच्या लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे हे या कृतीतून दिसून येते. कॉंग्रेसने भाजपला लोकशाही विरोधी संबोधण्यापूर्वी आपला स्वत:चा इतिहास विसरता कामा नये, कारण आणीबाणीसारख्या घटनांद्वारे अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांवर निर्बंध लादले गेले. सध्याचे कॉंग्रेसचे सर्वच नेते सत्तेस नसल्याने वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच अशा पद्धतीचे कृत्य करताना दिसत असल्याचा टोला जाधव यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेस असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कलाकार केतकी चितळे यासारख्या अनेकांना सरकारच्या विरोधात बोलल्यावर अटक करण्यात आली होती. यातून कॉंग्रेसचा खुनशी राजकारणाचा चेहरा दिसून येतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा 2024 मध्ये नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे काहीतरी करायचे आणि सगळ्या देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे अशी जी वृत्ती फोफावत चाललेली आहे ती खऱ्या अर्थाने वाईट आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT