Dada Bhuse : बसस्थानकांच्या बांधकाम-दुरुस्तीच्या कामांची चौकशी होणार; मंत्री भुसेंची घोषणा

Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यातील बसस्थानकांच्या बांधकाम-दुरुस्तीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली होती.
Dada Bhuse and Prakash Abitkar
Dada Bhuse and Prakash Abitkar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व बसस्थानकांच्या बांधकामासाठी आणि दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या बसस्थानकांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत.

या सर्व कामांची क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिवेशनात केली होती. त्यानुसार उत्तरावेळी प्रभारी परिवहन मंत्री दादाजी भुसे यांनी या सर्व कामांची चौकशी करण्याची घोषणा केली.

आबिटकर म्हणाले, 'माझ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये गारगोटी आगाराचे नुतनीकरण करण्यासाठी अथक प्रयत्नातून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु महामंडळाच्या अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे जुने 40 वर्षांपूर्वी बांधलेले बसस्थानक बरे म्हणण्याची वेळ आज आली आहे. सर्वसामान्य जनतेला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शासन काम करीत असताना महामंडळातील काही अधिकारी व ठेकेदार यांचेमुळे अशी निकृष्ट कामे होत आहेत हे दुर्दैवी आहे'.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dada Bhuse and Prakash Abitkar
Karad News : कऱ्हाडशी जवळीक तुटू देऊ नका; उड्डाणपुलाचा प्रश्न उदयनराजेंनी मांडला गडकरींपुढे

'तसेच या सर्व कामांची पाहणी करण्याचे काम क्वालिटी कंट्रोल विभागाकडून होत नसल्यामुळे कोणतेच निर्बंध या सर्व मंडळींवर नाहीत, त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे", असं ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या एसटी बसस्थानक बांधकाम व दुरुस्तीबाबतच्या सर्व कामांची चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची भूमिका घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील एसटीच्या बांधकामाची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. यावेळी उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यातील कामांची तांत्रिक पद्धतीने चौकशी करण्यात येईल, तसेच यामध्ये अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावरही निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल'.

(Edited by- Ganesh Thombare)

Dada Bhuse and Prakash Abitkar
Nagpur Winter Session : पुसेसावळीतील हिंसाचारावरुन आमदार अबू आझमी अन् गोरे यांच्यात जुंपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com